विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंडमध्ये World Test Championship ची फायनल मॅच खेळणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी भारतात लसीचा पहिला डोस घेतला आहे. परंतू WTC चा अंतिम सामना पार पडल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना लसीचा दुसरा डोस इंग्लंडमध्ये मिळणार आहे.
ADVERTISEMENT
…तर तुमचा इंग्लंड दौरा संपलाच म्हणून समजा, BCCI चा खेळाडूंना इशारा
ANI शी बोलत असताना इंग्लंड दौऱ्याशी संबंधित एका सूत्राने भारतीय खेळाडूंना लसीचा दुसरा डोस हा इंग्लंडमध्ये आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली मिळणार असल्याचं सांगितलं. “भारतात १८ वर्षांच्या पुढे लसीकरण सुरु झाल्यानंतर खेळाडूंनी आपल्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. ज्यावेळी सर्व खेळाडू नियमाप्रमाणे दुसऱ्या डोससाठी पात्र ठरतील त्यावेळी इंग्लंडमध्ये आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली त्यांना दुसरा डोस मिळेल.” टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी BCCI ने जय्यत तयारी केली आहे.
इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी संघात निवड झालेल्या प्रत्येक खेळाडूने मुंबईत दाखल होण्याआधी आपल्या घरात १० दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा. मुंबईत दाखल झाल्यानंतर सर्व खेळाडूंनी RTPCR टेस्ट केली जाईल, या टेस्टमध्ये ज्या खेळाडूचा रिपोर्ट पॉजिटीव्ह येईल त्याला संघात स्थान मिळणार नाही. मुंबईत सर्व टीम पुन्हा एकदा क्वारंटाइन होईल आणि त्यानंतर २ जूनच्या सुमारास भारतीय संघ इंग्लंडला रवाना होईल. इंग्लंडमध्ये गेल्यानंतरही भारतीय संघाला नियमाप्रमाणे स्वतःला क्वारंटाइन करावं लागणार आहे.
WTC Final : भारतीय संघाची घोषणा, अनुभवी रविंद्र जाडेजाचं पुनरागमन
ADVERTISEMENT