अनोळखी व्यक्तीनं बनवला विराट कोहलीच्या रूमचा व्हिडीओ; अनुष्का भडकली

मुंबई तक

• 07:33 AM • 31 Oct 2022

भारतीय क्रिकेट संघ T20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात उपस्थित आहे. पण विराट ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे तिथे त्याच्यासोबत असे काही घडले, ज्याचा लोक निषेध करत आहेत. हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी विना परवानगी विराटच्या खोलीत प्रवेश करून खोलीचा व्हिडिओ बनवला आणि नंतर तो सोशल मीडियावर शेअर केला. या कृतीवर विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. […]

Mumbaitak
follow google news

भारतीय क्रिकेट संघ T20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात उपस्थित आहे. पण विराट ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे तिथे त्याच्यासोबत असे काही घडले, ज्याचा लोक निषेध करत आहेत. हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी विना परवानगी विराटच्या खोलीत प्रवेश करून खोलीचा व्हिडिओ बनवला आणि नंतर तो सोशल मीडियावर शेअर केला. या कृतीवर विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. असे कृत्य करणाऱ्याला तिने जोरदार खडसावले आहे.

हे वाचलं का?

हॉटेल कर्मचाऱ्यांच्या या कृत्यामुळे अनुष्का भडकली

हॉटेल कर्मचाऱ्यांच्या या कृत्याचा विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. सर्वप्रथम विराटने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर चाहत्याने बनवलेला व्हिडिओ शेअर करून आपला राग व्यक्त केला. विराटनंतर आता त्याची पत्नी अनुष्का शर्मानेही या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. अनुष्का शर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर विराट कोहलीची पोस्ट शेअर करून या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. अनुष्काने गोपनीयतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अनुष्काने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, अनेक वेळा अशा घटनांना सामोरे जावे लागले आहे. परंतु ही गोष्ट मूर्खपणाचा कळस आहे. हे सहन केले जाऊ शकत नाही आणि ज्यांना वाटते की जर तुम्ही सेलिब्रिटी असाल तर तुम्हाला डील करावे लागेल, तर त्यांनी समजून घेतले पाहिजे की तुम्हीच या समस्येचे कारण आहात. अशा लोकांना सूचना देत अनुष्का शर्माने लिहिले आहे की, स्वत:वर थोडेसे नियंत्रण असले पाहिजे. अनुष्काने विचारले, हे सर्व तुमच्या बेडरूममध्ये होत असेल तर लाइन काय आहे?

विराटने गोपनीयतेबाबत प्रश्न उपस्थित केला

विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी बनवलेल्या खोलीचा व्हिडिओही शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना विराटने प्रायव्हसीबाबत एक लांबलचक नोटही लिहिली आहे. विराटने लिहिले, मला वाटतं की, त्यांच्या आवडत्या खेळाडूला पाहून चाहते खूप आनंदी आणि उत्साहित होतात. त्यांना भेटण्यास उत्सुक असतात आणि मी नेहमीच त्यांचे कौतुक केले आहे. पण इथे हा व्हिडीओ घाबरवणारा आहे आणि त्यामुळे माझ्या गोपनीयतेबद्दल मला पराकोटीची भावना निर्माण झाली आहे.

विराट कोहलीने पुढे लिहिले, जर मला हॉटेलच्या खोलीत प्रायव्हसी मिळू शकत नसेल, तर मी कुठल्याशा वैयक्तिक जागेची अपेक्षा करू शकतो. मला ही गोष्ट पटत नाही. कृपया लोकांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि त्यांना मनोरंजन म्हणून वागवू नका. विराट आणि अनुष्का शर्माच्या पोस्टमुळे सेलिब्रिटींच्या प्रायव्हसी आणि पर्सनल स्पेसबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

विराट कोहलीसोबतच्या या कृतीला अनेकजण भीतीदायक म्हणत आहेत. यामध्ये हॉटेल व्यवस्थापनाची मोठी चूक असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. ही घटना पूर्णपणे अनैतिक आहे. विराट कोहलीच्या खोलीत कोणी घुसून असा व्हिडिओ बनवू शकतो, यावर विश्वास बसत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्टारच्या गोपनीयतेबद्दल चिंता आणि आश्चर्य वाटले आहे. यावर तुमचे काय म्हणणे आहे?

    follow whatsapp