Vinesh Phogat : 'या' खेळाडूला कोर्टाने दिला न्याय, आता विनेशला रौप्य मिळणार?

मुंबई तक

11 Aug 2024 (अपडेटेड: 11 Aug 2024, 08:11 PM)

Vinesh Phogat News : जिम्नॅस्टिक्सच्या फ्लोर इव्हेंटमध्ये ॲना बार्बोसू या खेळाडूचा पराभव झाला होता. या पराभवानंतर ॲना बार्बोसू आणि तिच्या टीमने CAS मध्ये केस दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणी झालेल्या सुणावणीत न्यायालयाने अमेरिकन जिम्नॅस्ट जॉर्डन चिलीसचे कांस्यपदक हिसकावले.

vinesh phogat case update jordan chiles lose gymnastics bronze medal after cas decision romania ana barbosu won bronze in paris olympic 2024

विनेशला रौप्य पदक मिळण्याची आशा वाढली आहे

follow google news

बातम्या हायलाइट

point

विनेश फोगट प्रकरणाची सुनावणी पूर्ण

point

13 ऑगस्टला निकाल देणार

point

विनेश फोगटला रौप्यपदक मिळणार?

Vinesh Phogat, Pariy Olympic 2024 : भारतीय स्टार कुस्तीपटू विनेश फोगटचे वजन 100 ग्रॅम जास्त आढळल्याने तिला पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या अंतिम फेरीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. या संपूर्ण घटनाक्रमानंतर तिने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये (CAS) केस दाखल केली होती. या प्रकरणात सुनावणी पार पडली आहे.आता 13 ऑगस्टला निर्णय येणार आहे. दरम्यान विनेशच्या (Vinesh Phogat) आधीही एका खेळाडूने कोर्टात धाव घेतली होती. तिला कोर्टाने न्याय देऊन कांस्य पदकही दिले होते. त्यामुळे विनेशला रौप्य पदक मिळण्याची आशा वाढली आहे. या प्रकरणात आता काय निकाल लागतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

हे वाचलं का?

कोर्टाच्या निर्णयाने खेळाडू पराभूत होऊनही जिंकली

जिम्नॅस्टिक्सच्या फ्लोर इव्हेंटमध्ये ॲना बार्बोसू (Ana barbosu) या खेळाडूचा पराभव झाला होता. या पराभवानंतर ॲना बार्बोसू आणि तिच्या टीमने CAS मध्ये केस दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणी झालेल्या सुणावणीत न्यायालयाने अमेरिकन जिम्नॅस्ट जॉर्डन चिलीसचे (jordan chiles) कांस्यपदक हिसकावले. त्यामुळे जिम्नॅस्टिक्सच्या फ्लोर इव्हेंटमध्ये पराभूत होऊनही अण्णांनी कांस्यपदक जिंकले होते. या प्रकरणात कोर्टात गेल्याने ॲना बार्बोसूला न्याय मिळाला होता. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील 'इतक्या' महिलांचे अर्ज बाद, तुमचा नंबर आहे की नाही?

खरं तर, स्पर्धेच्या अंतिम फेरीत जॉर्डन चिलीसने 13.766 गुणांसह तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक जिंकले होते, तर अण्णाचा स्कोअर 13.700 होता आणि ती चौथ्या स्थानावर राहिल्यानंतर बाहेर पडली होती. त्यामुळे एक प्रकारे तिचा पराभव झाला होता. या पराभवानंतर ॲना बार्बोसू आणि तिच्या टीमने क्रीडा लवादात (CAS) केस दाखल केली होती. यामध्ये तिने जॉर्डन चिलीसला चुकीचे गुण देण्यात आले होते, ज्यामुळे ती तिसऱ्या क्रमांकावर राहिली आणि तिने कांस्यपदक जिंकले होते,असा आक्षेप घेण्यात आला होता. 

या प्रकरणी क्रीडा लवादात दीर्घ सुनावणी पार पडली होती त्यानंतर ॲनाला योग्य न्याय मिळाला होता. क्रीडा लवादाने जॉर्डन चिलीचा गुणही वजा केला आहे. या निर्णयानंतर जॉर्डन चिलीचा स्कोअर 13.666 झाला आहे. यासह ती पाचव्या स्थानावर पोहोचली. तर अॅना बार्बोसू तिसऱ्या स्थानावर आली. अशाप्रकारे न्यायालयाच्या निर्णयानंतर अॅनाला कांस्यपदक देण्यात आले. आता या निर्णयानंतर अॅना खूश आहेत. जिम्नॅस्टिक्स फ्लोअर इव्हेंटच्या अंतिम फेरीत ब्राझीलच्या रेबेका अँड्रेडने सुवर्णपदक तर अमेरिकेच्या सिमोन बायल्सने रौप्यपदक पटकावले होते.

हे ही वाचा : Mumbai tak Baithak 2024 Schedule: विधानसभेआधी उडणार धुरळा! ‘मुंबई Tak बैठक’मध्ये 'हे' दिग्गज मांडणार व्हिजन

विनेशला न्याय मिळणार

विनेश फोगटचा खटलाही क्रीडा लवादाच्या कोर्टात सुरू आहे. 50 किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या अंतिम फेरीत प्रवेश करून विनेशला रौप्य पदकाची खात्री होती, परंतु तिला पदक सामन्यापूर्वीच अपात्र ठरवण्यात आले, कारण तिचे वजन ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी 100 ग्रॅम जास्त होते. विनेशने उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमनचा 5-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. विनेशला फायनल जिंकून सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती. पण अंतिम सामन्याच्या दिवशी सकाळी विनेशचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले आणि तिला अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर विनेशने क्रीडा लवादामध्ये केस दाखल केली असून, त्यावर 13 ऑगस्ट रोजी निर्णय होणार आहे. विनेशच्या बाजूने निर्णय आल्यास त्यांना संयुक्तपणे रौप्यपदक मिळेल.

    follow whatsapp