ADVERTISEMENT
अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्यात विराटने शतकी खेळी खेळत 186 धावा केल्या.
या खेळीसह कोहलीने दीर्घकाळानंतर कसोटी सामन्यामध्ये शतक झळकावलं आहे.
अनेकांना माहिती आहे की, विराटला प्रेमाने ‘चिकू’ म्हणतात. पण, ते नाव कुणी दिलं हे माहिती तुम्हालाही नसेल.
क्रिकेट कोच अजित चौधरी यांनी विराटला हे नाव दिलं होतं. यामागे एक रंजक कहाणी आहे.
करिअरच्या सुरूवातीला कोहलीने दिल्लीसाठी खेळल्या जाणाऱ्या एका सामन्यापूर्वी केस छोटे कापले होते.
या लूकमध्ये विराट कोहली खूपच गुबगुबीत दिसत होता. तसेच त्याचे कानही मोठे दिसत होते.
कोहलीचा हा लूक पाहाताच अजित चौधरी यांना चंपक कॉमिकमधील चिकू नावाच्या सशाची आठवण आली, ज्याचे मोठे कान होते.
त्यामुळेच अजित चौधरी यांनी विराटला ‘चिकू’ म्हणायला सुरूवात केली आणि त्याचं ते नाव लोकप्रिय झालं.
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी विराटला नेहमी चिकू या नावाने चिडवत असे.
ADVERTISEMENT