ADVERTISEMENT
अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले.
विराट कोहलीचं हे कसोटी क्रिकेटमधील 28वं शतक आहे, जे साडेतीन वर्षांनंतर त्याने झळकावलं आहे.
कसोटी सामन्यात सर्वांनाच बऱ्याच दिवसांपासून विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची प्रतीक्षा होती.
इंदूर कसोटी सामन्यानंतर ब्रेकमध्ये विराट कोहलीने उज्जैनमध्ये बाबा महाकालचं दर्शन घेतलं होतं.
महाकालेश्वराच्या दर्शनानंतर कोहलीने ही कामगिरी बजावली आहे, त्यामुळे चाहते खुश होत आहेत.
विराट कोहलीबद्दल ट्विटरवर अनेक मीम्स बनवण्यात आले असून, ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
याआधी कोहलीने नीम करोली बाबाचंही दर्शन घेतलं होतं. त्यानंतर त्याने वनडेमध्ये शतक झळकावलं होतं.
ADVERTISEMENT