world cup 2023 schedule time table: क्रिकेटप्रेमी ज्याची चातकासारखी वाट बघतात, त्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तारखा अखेर समोर आल्या आहेत. आगामी विश्वचषक भारतात होणार असून, तारखा समोर आल्या आहेत. त्यामुळे वर्ल्ड कपची फायनल कधी आणि कुठे होणार हेही निश्चित झालं आहे. वर्ल्ड कप 5 ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकतो, असं अशी माहिती समोर आलीये. (world cup 2023 schedule, final match date)
ADVERTISEMENT
एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळापत्रकाबद्दलचं वृत्त इएसपीएन क्रिक इन्फो ने दिलं आहे. दिलेल्या वृत्तानुसार 10 संघाचा समावेश असलेल्या वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयने जवळपास बारा ठिकाणं निश्चित केली आहेत.
बीसीसीआयने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी सर्वात मोठं स्टेडियम अर्थात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचा यादीत समावेश केला आहे. त्यामुळे अहमदाबादमधील याच मैदानावर अंतिम फायनल होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.
Ind Vs Pak : पाकिस्तान 2023 चं वर्ल्ड कप खेळणार नाही? हे कारण आलं समोर
2023 मधील वर्ल्ड 46 दिवस चालणार असून, या दरम्यान 10 संघामध्ये 3 प्ले ऑफ बरोबरच एकूण 48 सामने खेळवले जाणार आहे.
World Cup 2023: कोणत्या शहरात होणार सामने?
बीसीसीआयने वर्ल्ड कपचे सामने खेळवण्यासाठी अहमदाबादबरोबर बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, धर्मशाळा, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, इंदूर, राजकोट आणि मुंबई ही ठिकाणी शॉर्टलिस्ट केली आहेत. आयसीसीच्या स्पर्धांचं वेळापत्रक एका वर्षापूर्वीच जाहीर केलं जात मात्र, यावेळी बीसीसीआयला केंद्र सरकारकडून काही महत्त्वाच्या मुद्द्यांना मंजुरी मिळणे बाकी आहे. यातील पहिला मुद्दा आहे तो पाकिस्तान संघाला व्हिसा मंजूरी आणि दुसरा स्पर्धेला करात सुट देण्याबद्दल.
World Cup 2023: पाकिस्तानला व्हिसा मिळणार का?
आयसीसीची मागील मीटिंग दुबईमध्ये झाली होती. रिपोर्ट्सनुसार या मीटिंगमध्ये बीसीसीआयने हे आश्वासन दिलं आहे की वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी संघाला भारतीय दौऱ्यासाठी व्हिसा दिला जाईल. दुसरं म्हणजे करात सवलत देण्याचा मुद्दा, तर त्यावरही अशी आशा आहे की, बीसीसीआय लवकरच भारत सरकारच्या भूमिकेबद्दल आयसीसीला कळवणार आहे.
2012 पासून भारत- पाकिस्तानमध्ये एकही मालिका नाही
डिसेंबर 2012 पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका झालेली नाही. त्यावेळी पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. दोन्ही संघामध्ये 2 टी20. 3 एकदिवसीय मालिका खेळवली गेली होती. टी20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली होती. तर एकदिवसीय मालिका पाकिस्तानने 2-1 ने जिंकली होती.
ADVERTISEMENT