WTCची शर्यंत संपली! पाहा पॉईंट टेबल, फायनल कोणामध्ये रंगणार?

मुंबई तक

• 07:40 AM • 20 Mar 2023

WTC 2023 Final Points Table : दोन टेस्ट सामन्यांच्या मालिकेत (New Zealand vs Sri lanka) न्युझीलंडने श्रीलंकेचा 2-0ने पराभव केल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनची (World Test Championship) शर्यंत संपली आहे. आता भारत-ऑस्ट्रेलियामध्ये (India vs Australia) रंगणाऱ्या अंतिम सामन्याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागले आहे. खरं तर ही शर्यंत टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगलेल्या चौथ्या टेस्ट सामन्याच्या […]

Mumbaitak
follow google news

WTC 2023 Final Points Table : दोन टेस्ट सामन्यांच्या मालिकेत (New Zealand vs Sri lanka) न्युझीलंडने श्रीलंकेचा 2-0ने पराभव केल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनची (World Test Championship) शर्यंत संपली आहे. आता भारत-ऑस्ट्रेलियामध्ये (India vs Australia) रंगणाऱ्या अंतिम सामन्याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागले आहे. खरं तर ही शर्यंत टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगलेल्या चौथ्या टेस्ट सामन्याच्या शेवटच्या दिवशीच संपली होती. कारण या दिवशी न्यूझीलंडने श्रीलंकेवर पहिला टेस्ट विजय मिळवला होता.ज्यामुळे टीम इंडिया WTCच्या फायनलमध्ये दाखल झाली होती. मात्र औपचारीकता म्हणून दुसरा टेस्ट सामना खेळवावा लागला होता. आता हा दुसरा टेस्ट सामना देखील न्युझीलंडने जिंकल्यानंतर WTCने फायनल पॉंईट्स टेबल जाहिर केले आहे. (world test championship 2021-23 final points table india vs australia final date venue wtc)

हे वाचलं का?

श्रीलंका थोड़क्यासाठी हुकली

WTCच्या फायनल पॉंईट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया (Australia)पहिल्या क्रमांकावर होती, तर भारत (India) दुसऱ्या स्थानी आहे. आणि श्रीलंका तिसऱ्या स्थानी होती. आईसीसीच्या नियमानुसार पॉंईट्स टेबलमध्ये टॉप 2 मध्ये असणाऱ्या टीम फायनल गाठतात. या चॅम्पियनशीपची शेवटची सिरीज न्युझीलंड आणि श्रीलंकेमध्ये रंगली होती. या सीरीजमध्ये न्युझीलंडने 2-0ने श्रीलंकेचा पराभव केला होता. WTCच्या शर्यतीत श्रीलंका पुढे होती, तर न्यूझीलंड शर्यतीतच नव्हती. जर श्रीलंकेने दोन्ही सामने जिंकले असते तर तिने फायनलमध्ये स्थान पक्क केले असते आणि भारत बाहेर झाला असता. मात्र न्युझीलंडने दोन्ही सामने जिंकले आणि श्रीलंकेची संधी हूकली.

Viral Video : पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या ‘त्या’ कृत्यावर यूजर्स प्रचंड संतापले!

फायनल पॉईंट्स टेबल

पॉईंट्स टेबलनुसार ऑस्ट्रेलियाने (Australia) 11 सामने जिंकले होते, तर 3 सामन्यात पराभव आणि 5 सामने ड्रॉ झाले होते. ऑस्ट्रेलिया 66.67 गुणांसह पहिल्या क्रमांकावर होती. तर 58.6 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर भारत होता. भारताने (India) 10 सामने जिंकले होते तर 5 सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. आणि 3 सामने ड्रॉ झाले होते.

Ind vs Aus: भारताचा लाजिरवाणा पराभव, रोहित शर्मा फलंदाजांवर संतापला

टीम इंडियाचे प्रदर्शन

  • इग्लंड विरूद्ध 4 टेस्ट सामन्यात 2-2 ने बरोबरी

  • न्यूझीलंड विरूद्ध 2 टेस्ट सामन्यात 1-0 ने हरवले.

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध 3 टेस्ट सामन्यात 1-2 ने पराभव

  • श्रीलंकेला 2 टेस्ट सामन्यात 2-0 ने हरवले.

  • बांगलादेशला 2 टेस्ट सामन्यात 2-0 ने क्लिन स्वीप केले.

  • ऑस्ट्रेलिया विरूद्ध 4 टेस्ट सामन्यात 2-1 ने जिंकला

Ind vs Aus : टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाचा टी20 स्टाईल विजय

टीम इंडियाने (India) नुकताच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत सलग चौथ्यांदा विजय मिळवला. टीम इंडियासाठी हा ऐतिहासिक विजय ठरला. आता या सामन्यानंतर दोन्ही संघाना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भिडायचे आहे. हा सामना 7 ते 11 जुन दरम्यान लंडनच्या ओव्हल मैदानात रंगणार आहे.या सामन्यासाठी 12 जून हा दिवस ऱिजर्व डे ठेवण्यात आला आहे. दरम्यान या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता आहे.

    follow whatsapp