WTC Final : Roof Stadium ते Brumbrella, पावसामुळे होणारा क्रिकेटचा खेळखंडोबा टाळता येणं शक्य

मुंबई तक

• 11:18 AM • 22 Jun 2021

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना पावसामुळे जवळपास वाया गेला आहे. आतापर्यंत झालेल्या ४ पैकी २ दिवसांचा खेळ हा पावसामुळे रद्द झाला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपसारख्या महत्वाच्या स्पर्धेचं अशा पद्धतीने आयोजन केल्यामुळे क्रिकेटचे चाहते ICC वर भडकले आहेत. अनेक माजी खेळाडूंनी तर कोणत्याही महत्वाच्या स्पर्धेचा अंतिम सामना हा इंग्लंडमध्ये खेळवता कमा नये असंही […]

Mumbaitak
follow google news

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना पावसामुळे जवळपास वाया गेला आहे. आतापर्यंत झालेल्या ४ पैकी २ दिवसांचा खेळ हा पावसामुळे रद्द झाला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपसारख्या महत्वाच्या स्पर्धेचं अशा पद्धतीने आयोजन केल्यामुळे क्रिकेटचे चाहते ICC वर भडकले आहेत. अनेक माजी खेळाडूंनी तर कोणत्याही महत्वाच्या स्पर्धेचा अंतिम सामना हा इंग्लंडमध्ये खेळवता कमा नये असंही म्हटलंय.

हे वाचलं का?

पावसामुळे सामन्यात व्यत्यय येणं ही बाब नवीन नाही, आतापर्यंत अनेक सामने पावसामुळे रद्द झालेत. अनेकदा टीम इंडियासाठी हा पाऊस देवदूतासारखा धावून आला आहे. परंतू वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपसारख्या महत्वाच्या स्पर्धेचा अंतिम सामना जर पावसामुळे वाया जाणार असेल तर क्रिकेटप्रेमींची होणारी निराशा ही रास्त आहे. अशा परिस्थितीत असे काय पर्याय आहे की ज्यामुळे पावसामुळे क्रिकेट सामन्याता खेळखंडोबा टाळता येणं शक्य आहे.

पहिला पर्याय – रुफटॉप स्टेडीअम

रुफटॉम स्टेडीअमची मागणी ही अनेक वर्षांपासून होते आहे. परंतू एखाद्या मैदानावर छप्पर बांधणं हे खूप खर्चिक काम आहे. काही महिन्यांपूर्वी विम्बल्डनच्या मैदानावर छप्पर बसवून घेण्यासाठी १ कोटी ७० लाख पाऊंड खर्च आला होता. टेनिसचं मैदान हे क्रिकेटच्या मैदानापेक्षा आकाराने छोटं असतं तरीही यासाठी आलेला खर्च पाहता क्रिकेटच्या मैदानावर हा प्रयोग करायचा ठरला तर त्याचा खर्च हा अवाढव्य होऊ शकतो. भारतामध्ये एका मैदानावर रुफटॉप चा प्रकल्प आजमवण्याचा प्रयत्न करायचं म्हटलं तरीही याला अनेक वर्षांचा कालावधी लागू शकतो. तसेच यासाठी होणारा खर्चही अवाक्याबाहेरचा असेल.

ऑस्ट्रेलियातल्या डॉकलँड स्टेडीयममध्ये रुफटॉप सुविधा उपलब्ध आहे. गरज असेल तेव्हा छप्पर नसेल तेव्हा छप्पराशिवाय सामने या मैदानात खेळवता येऊ शकतात. या मैदानावर बिग बॅश लिग आणि काही आंतरराष्ट्रीय सामनेही खेळवण्यात आलेले आहेत. परंतू या मैदानावर रुफटॉप सुविधा तयार करण्यासाठी झालेला खर्च पाहता इथे आजही हा खर्च वसूल करण्यासाठी ऑस्ट्रेलियन फुटबॉल लिग, A-League, नॅशनल रग्बी लिग यासारख्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. तसेच या मैदानावर आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये Drop in Pitch ची सोय होती. वर्ल्डकप किंवा WTC सारख्या स्पर्धांमध्ये अशा प्रकारचं पिच हे संघांसाठी योग्य ठरत नाही.

दुसरा पर्याय – Weather Balloon

२०१९ मध्ये इंग्लंड क्रिकेट बोर्डाने The Moonshot कंपशीनी चर्चा करुन वेदर बदलूनच्या प्रस्तावावर चर्चा केली होती. संपूर्ण मैदानाचा भाग व्यापला जाईल अशा पद्धतीने हे वेदर बदलून वर सोडून एका विशिष्ठ प्रक्रियेद्वारे पाऊस पडणं थांबवता येणं शक्य आहे. या प्रस्तावात नेमकी काय माहिती होती हे नंतर समोर आलं नाही पण तरीही या पर्याय वापरण्यात काही अडचणी आहेतच.

एखाद्यावेळी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाची परिस्थिती असेल त्यावेळी ही यंत्रणा कितपत काम करेल याची खात्री नाहीये. तसेच अशावेळी मैदानात सामना पाहण्यासाठी आलेल्या लोकांच्या जिवालाही धोका पोहचू शकतो. रुफटॉप स्टेडीअमच्या तुलनेत हा पर्याय सोपा आणि स्वस्त असला तरीही हा लागू करण्यासाठी यात अजुन सुधारणेची गरज आहे.

तिसरा पर्याय – Brumbrella

पावसाला थांबवणं आपल्या हातात नसलं तरीही त्यापासून मैदान आणि खेळपट्टीचा बचाव करण्यासाठी प्रयत्न नक्कीच केले जाऊ शकतात. अनेकदा काही सामने पाऊस थांबल्यानंतरही मैदान आणि खेळपट्टी ओलरस राहिल्यामुळे रद्द झाल्याचं आपण पाहिलं आहे. WTC च्या फायनल मॅचमध्येही आपल्याला याचा प्रत्यय आलाय.

अशावेळी मैदानात खेळपट्टीला पावसाचा धोका पोहचू नये म्हणून उपाययोजना केल्यानंतर मैदानात इतर ठिकाणी शिट्स पसरवल्या जातात. उपखंडातील काही मैदानांमध्ये संपूर्ण मैदान हे tarpaulin च्या शिटने झाकलं जातं. १९८१ ते २००१ या काळात इग्जबस्टन येथे Brumbrella नावाने अशा पद्धतीने मैदान कव्हर केलं जायचं.

परंतू काही खेळाडूंनी संपूर्ण मैदान शिटने कव्हर केल्यानंतर खेळपट्टीवरील काही भाग खराब होऊन बॅटींग करणं अवघड होत असल्याची तक्रार केली होती, त्यानंतर ICC ने ही पद्धत थांबवली. या सुविधेतली आणखी एक अडचण म्हणजे, संपूर्ण मैदान शिटने झाकून घ्यायचं असेल तर मॅनपॉवरची गरज असते. इंग्लंड-ऑस्ट्रेलियामध्ये वाढलेल्या लेबर कॉस्टमुळे अशा कामांसाठी जास्तीची मॅनपॉवर उपलब्ध होत नाही. परंतू WTC Final सारख्या महत्वाच्या सामन्यासाठी आयसीसीने अशा पर्यायाचा विचार करायाल काहीच हरकत नाही.

चौथा पर्याय – पॉवरफूल ड्रेनेज सिस्टीम

पावसामुळे सामन्यात येणारा व्यत्यय आणि खेळखंडोबा लक्षात घेऊन जगभरातील अनेक मैदानांमद्ये ड्रेनेज सिस्टीम अद्ययावत करण्याच आलेली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर पाऊस थांबल्यानंतर अर्ध्या तासात पाणी ड्रेनेज होईल अशी सुविधा तयार केली आहे. याचसोबत चिन्नास्वामी, इडन गार्डन्स, लॉर्ड्स, मेलबर्न क्रिकेट मैदानावरही अशा प्रकारची ड्रेनेज सिस्टीम तयार आहे. योग्य नियोजन आणि स्टेडीमय बांधकामात काही बदल करुन ही सिस्टीम राबवणं सहज शक्य आहे.

आयसीसीने WTC च्या फायनल मॅचसाठी रिझर्व्ह डे ची सोय केलेली आहे. परंतू एखाद्या महत्वाच्या सामन्यात पावसाचा अंदाज घेऊन एका ऐवजी किमान दोन रिझर्व्ह डे ची तरतूद आयसीसी करु शकते. दरम्यान पाचव्या दिवशीही सामना सुरु होण्यासाठी काही काळ उशीर झाला त्यानंतर खेळाला सुरुवात झाली.

    follow whatsapp