Astrology: पाल अंगावर पडणं शुभ की अशुभ... नेमकं काय होतं? हे 3 संकेत असतात खतरनाक
Astro Tips: तुमच्या शरीरावर पाल पडणे (Lizard astrology) हा केवळ योगायोग नसून भविष्याचे लक्षण असू शकते. जाणून घ्या याविषयी सविस्तरपणे.
ADVERTISEMENT

Astro Tips: तुमच्या शरीरावर पडणं पडणे (Lizard astrology) हा केवळ योगायोग नसून भविष्यात घडणाऱ्या काही महत्त्वपूर्ण गोष्टींचे संकेत असू शकतात. ज्योतिषशास्त्रात, पालीबाबत शुभ आणि अशुभ अशा दोन्ही स्वरूपातील गोष्टी सांगितल्या आहेत. शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर पडणारा पाल नेमके काय संकेत दर्शवितो याबद्दल ज्योतिषी भूषण कौशल यांनी सविस्तरपणे सांगितले आहे. या छोट्याशा प्राण्यामुळे तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडू शकतात ते आपण जाणून घेऊया.
पाल अंगावर पडण चांगले की वाईट?
ज्योतिषशास्त्रानुसार, पाल अंगावर पडणे हे शुभ किंवा अशुभ शकुनाचे लक्षण मानले जाते. ते शरीराच्या कोणत्या भागावर पडते यावर अवलंबून असते की, ते शुभ आहे की अशुभ आहे. आचार्य भूषण कौशल यांच्या मते, याबाबत नेमकेपणाने समजून घेणे खूप महत्वाचे आहे, कारण त्याचा तुमच्या भविष्यातील घटनांवर परिणाम होऊ शकतो.
हे ही वाचा>> Vastu Tips: तुमच्या घरातून 'या' गोष्टी ताबडतोब काढा बाहेर, नाहीतर काही खरं नाही!
पाल शरीराच्या कोणत्या अवयवांवर पडणं असतं शुभ?
- डोक्यावर: जर पाल डोक्यावर पडली तर ते खूप शुभ मानले जाते. यामुळे सन्मान वाढतो आणि नोकरीत बढतीची शक्यता वाढते.
- कानावर: कानावर पाल पडणे हे शुभवार्ता दर्शवते. आर्थिक लाभाचीही अपेक्षा करता येईल.
- झोपताना मानेवर: झोपत असताना मानेवर पाल पडली तर ते शत्रूंच्या नाशाचे लक्षण असते.
- कपाळावर (झोपताना): कपाळावर पडल्याने घरी पाहुणे येण्याची किंवा लग्न जुळण्याची शक्यता वाढते.
- उजवी कंबर: जर उजव्या कंबरेवर पाल पडली तर सरकारी लाभ, यश किंवा नोकरी मिळण्याची शक्यता निर्माण होते.
- पोटावर: पाल पोटावर पडली तर हे सुख, समृद्धी आणि संपत्ती दर्शवते.
- उजवा हात: उजव्या हातावर पाल पडणे हे धनप्राप्तीचे शुभ लक्षण आहे.
- नाभीजवळ: नाभीभोवती पडल्याने वाईट दिवसांचा अंत होण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.
- पुरुषाच्या छातीवर: पुरुषाच्या छातीवर पडल्याने परदेश प्रवासाची शक्यता निर्माण होते.
हे ही वाचा>> Vastu: घरात चुकीच्या ठिकाणी लावाल घड्याळ तर तुमचा Time येईल खराब, पण 'इथे' लावाल तर पैसाच पैसा!
अशुभ संकेत
- डावा खांदा: डाव्या खांद्यावर पाल पडणे अशुभ मानले जाते.
- डावा हात: डाव्या हातावर पाल पडल्यास पैसे गमावण्याची शक्यता असते.
- पाठीवर: जर तुमच्या पाठीवर पाल पडली तर आजार किंवा फसवणूक होण्याचा धोका वाढू शकतो.
ज्योतिषशास्त्रीय महत्त्व
आचार्य भूषण कौशल स्पष्ट करतात की, पालीबाबतचे हे संकेत प्राचीन ज्योतिषशास्त्राचा एक भाग आहे. हा छोटे प्राणी तुमच्या आयुष्यातील येणाऱ्या घटनांचे सूचक असू शकते. तथापि, त्याचा परिणाम व्यक्तीच्या कुंडली आणि परिस्थितीवर देखील अवलंबून असतो.
टीप: येथे दिलेली माहिती केवळ गृहितकांवर आधारित आहे. येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की मुंबई Tak वरील प्रकारच्या कोणत्याही माहितीची पुष्टी करत नाही. त्यामुळे संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.