वारसा! विचारांचा बरं का फक्त रक्ताचा नाही…
‘राजनीती’ हा शब्द “राज” आणि “नीती” या दोन शब्दांनी तयार झाला असला तरी राजनीती’ हा शब्द असा एकत्र करून उच्चारला तरी प्रतिसाद 99.99 टक्के हा नकारात्मक आणि निरूत्साही असतोच. I don’t know politics, I don’t follow …. असं म्हणून किमान नम्रतेने बोलणारे कमी का होईना आढळतातच..’राज’ (जवाबदारी) ‘नीती’ ने करण्यासाठी असते आणि म्हणून शब्द राजनीती […]
ADVERTISEMENT
‘राजनीती’ हा शब्द “राज” आणि “नीती” या दोन शब्दांनी तयार झाला असला तरी राजनीती’ हा शब्द असा एकत्र करून उच्चारला तरी प्रतिसाद 99.99 टक्के हा नकारात्मक आणि निरूत्साही असतोच. I don’t know politics, I don’t follow …. असं म्हणून किमान नम्रतेने बोलणारे कमी का होईना आढळतातच..’राज’ (जवाबदारी) ‘नीती’ ने करण्यासाठी असते आणि म्हणून शब्द राजनीती आहे, पण काही दशकांत आम्ही राजकारण्यांनी त्याचा अर्थ बदलला आहे.
सोशल मीडियाचा प्रादुर्भाव हा प्रभावापेक्षा जास्त झाला आहे. मीडियाचा उपयोग आपल्या दूरच्या माणसांना जवळ आणण्यात नक्की झाला, परंतू सोशल मीडियाचा उपयोग माणुसकीला माणसांपासून दूर नेण्यात करण्यात आला हे मात्र सूर्यप्रकाशाएवढं सत्य आहे. राजकारणात तर या आयुधांची अस्त्र झाली आहेत, यात बदल होणं अपरिहार्य असलं तरी कठीण आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
लेखणीतून आपले विचार पेरतांना जो आनंद मिळतो, आपलं बऱ्यापैकी मोत्यासारखं अक्षर बघताना जे मनातून बरं वाटतं ते काॅम्प्युटरवर टपटप टायपिंग करून कसं वाटेल? राजकारणात आम्ही काही जण एका भव्य गोष्टीचे प्रतीक आहोत, ते म्हणजे ‘वारसा’..आम्ही सर्व ‘वारसा’ या शब्दांचा अधिक कमी उपयोग घेत आहोत असं जगाला नक्की वाटतं..आम्हाला काय वाटतं ? आमचे चॅलेंजेस काय? सहज आमच काय आणि कठीण कुठे वाटतं? हे सर्व सोशल मीडिया वीरांनो भावनेचा चष्मा ठेवून बघा..तुम्हीही कोणाचा वारसा चालवता..कोणी स्वतःच्या बाबांसारखं उत्तम गात असेल..कोणी आईसारखी सुगरण किंवा कोणी आईसारखा सुगरण ही असू शकतो बरं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मी, प्रीतम, पूनम, अमित देशमुख, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम,आकाश फुंडकर ,..इतकचं काय गांधी, पवार आणि अगदी मा. उद्धवजी हे सर्व राजकारणातील वारसा आहेत ना? माझ्या जिल्हयात तर सर्व तालुक्यात वारसा हक्कांनी आलेली पिढी आहेच. वारसांना सहज संधी असण हे गौरवास्पद आहे असे अजिबात नाही पण त्यांना जबाबदारी असणे आवश्यक आहे.. तर नेमकं वारसा या शब्दात काय आहे? त्याचे फायदे आणि तोटे काय? चला माझ्या डोक्यापुरतं मांडते..
संधी –
राजकीय परिवारातून आलो की संधी सहज मिळते, हे सर्वाना वाटतं. काही अंशी हे सत्य आहे परंतू कधी कधी उलटही होतं. लोक तुम्हाला संधी देतात पण मार्क्स देताना जास्त पडताळतात. अगदी शाळेचे शाररिक शिक्षण असो, काॅलेजमधील viva असो, नोकरीतील Performance असो किंवा अगदी राजकारणातील भूमिका असो..त्यामुळे संधी सहज येते तशी जातेही..संधीचे सोने करण्याची कसरत वाटली म्हणून अधिक दक्षतेने करावी.
जबाबदारी –
संधी नसेल तरी जवाबदारी येतेच. राजकीय जीवनात काम करणाऱ्या परिवारांना जवाबदारीने वागलचं पाहिजे. इतरांना जसं जवाबदारी नाकारण्याची शिक्षा असते तशी राजकारणातील वारसा असणारांना त्यांच्या वारसा च्या साईज प्रमाणे गुणाकार करून परिणाम भोगावे लागतात. तुम्ही सत्तेत आहात- नाहीत, पदावर आहात-नाहीत, लोकांच्या डोळ्यातील अपेक्षा जगवणं व त्या जगवण्यासाठी जगणं हे कांही सोपं नाही. प्रत्येकासाठी नाही पण काही sincere लोकांसाठी ‘वारसा’ हा “वसा” आहे, असतो आणि त्या जीवनात अनेक परिक्षा असतात. देणं महत्वाचं..कधी पास..कधी नापास..पण परिक्षा द्यावीच लागते.
तुलना –
तुलना ही अपरिहार्यता आहे. चांगली आणि वाईट दोन्ही तुलना करणं लोकांच कर्तव्य असतं जणू..तुम्ही उत्तम काम केलं तर करावचं लागेल..”साहेब तर असं करायचे… नाही तर तुम्ही “साहेबांच्या सारखे जन्मात नाही होऊ शकत.”आता दोन्ही स्टेटमेंट मध्ये वारसा असणाऱ्याला काही बोलता येत नाही. कारण ते त्याच्या पित्याची तारीफ , कौतुक करत करत आपल्याला शालजोडे मारतात. खरंच खूप मनापासून कौतुकही करतात बर्याच वेळा. सुदैवाने मला हा शालजोडेचा अनुभव दुर्लभच मिळाला.
मग काय असावं सूत्र काम करण्याचे? मुख्य विचार जणू “पाठीचा कणा” तो बदलू नका ..जग खूप अदभूत असतं. स्वत: बना.. वेळ घ्या ,आकलन करा.. हळूहळू थोडाथोडा बदल करत हे प्राप्त करा. आपल्यातील ‘वेगळेपण’ जे आपल्याला व लोकांना ताकत देतं ते जपा. जे गुण उपजत आहेत ते तर आहेतच! सूर्यप्रकाश असतांना देखील आकाशात चंद्र दिसतो तसं जीवन असतं..
आपल्या पित्या- नेत्याच्या सोबत जगताना..!
माझ्यासाठी पित्याच्या पश्चात जणू अनुभव बदलले..सुर्यास्तानंतर चंद्राचे तेज डोळयाला दिसते, प्रकाश सूर्याचा व चंद्राची स्वत:ची शीतलता असतेच ना? मी सर्व वारसांना सांगते.. प्रकाश आल्याला सुदैवाने मिळाला आहे पण स्वत:चं सौंदर्य व शीतलता त्यात दुग्धशर्करा योग आणा. प्रत्येकाला आपला शुन्य असतोच आणि आपल स्वत:च शिखर गाठावं लागतचं. वारसा हे केवळ “भागिदारी” नाही, अत्यंत गंभीर “जबाबदारी” आहे, ते जंक्शन बना ताकत..दानत.. याचं..!
मग सिनेसृष्टीतील, कला जगतातील सेवा जगतातील किंवा राजकारणातील वारसांना हेच लागु आहे. स्वत:चे कष्ट गुण व विचारांचा वारसा याचा संगम करा. “ज्यांना हे नाही त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करा” तुम्हाला मिळाले आहे ना मग विचारांच्या या वारश्याला सेवेचा “वारसा” करा नव्हे “वसा” करा! “तुम्ही घडलात तर अनेकांना घडवा” “जंक्शन” बना गुणांच्या रुळांना संधीच्या रुळांवर नेणार “जंक्शन”!
ADVERTISEMENT