Personal Finance: मुलीच्या लग्नासाठी मिळतील 27 लाख रुपये, LIC चा हा प्लॅन पाहिला का, फक्त 121 रुपयात!
भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ने मुलींसाठी एक उत्तम योजना आणली आहे. ही अशी योजना आहे ज्यामध्ये लहान बचत करूनही मुलीच्या लग्नासाठी मोठा निधी निर्माण करता येतो. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

LIC ची मुलींसाठी नवीन योजना

मुलीच्या लग्नापर्यंत मिळवा 27 लाख रुपयांचा निधी

दररोज छोटी बचत करुन मुलीच्या लग्नासाठी लाखोंचा निधी मिळवा
LIC Scheme: भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ने मुलींसाठी एक उत्तम योजना आणली आहे. खरंतर ही योजना मुलींच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या खर्चाची चिंता दूर करू शकते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 'एलआयसी कन्यादान पॉलिसी' ही अशी योजना आहे ज्यामध्ये लहान बचत करूनही मुलीच्या लग्नासाठी मोठा निधी निर्माण करता येतो. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
दररोज 121 रुपये बचत करून 27 लाखांचा निधी मिळवा
LIC कन्यादान योजना मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यास तसेच त्यांच्या लग्नासाठी पुरेसा निधी उभारण्यास मदत करते. या योजनेअंतर्गत, तुम्हाला तुमच्या मुलीसाठी दररोज फक्त 121 रुपये जमा करावे लागतील, म्हणजेच एका महिन्यात एकूण 3600 रुपये. अशाप्रकारे, नियमितपणे गुंतवणूक करून 25 वर्षे (पॉलिसी मॅच्युरिटी कालावधी) पूर्ण झाल्यावर तुम्हाला 27 लाखांपेक्षा जास्त निधी एकरकमी मिळेल.
आवश्यकतेनुसार मॅच्युरिटी कालावधी निवडा
एलआयसीची ही उत्कृष्ट पॉलिसी 13 ते 25 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसाठी घेता येते. उदाहरणार्थ, जर तुमची मुलगी दोन वर्षांची असेल आणि तुम्ही 25 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसह 10 लाखांचा प्लॅन घेतला आणि दररोज 121 रुपये जमा केली, तर तुमची मुलगी 27 वर्षांची झाल्यावर तिला 27 लाख रुपये मिळतील. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गुंतवणूक रक्कम वाढवू किंवा कमी करू शकता आणि त्यानुसार तुमचा फंड बदलेल.
कर सवलत देखील असेल
मुलींसाठी बनवलेल्या या LIC योजनेचा लाभ घेण्यासाठी वडिलांचे किमान वय 30 वर्षे आणि मुलीचे वय किमान एक वर्ष असावे. या पॉलिसीमध्ये मोठ्या निधी जमा होण्यासोबतच कर लाभ देखील उपलब्ध आहेत. एलआयसी कन्यादान पॉलिसी ही आयकर कायदा 1961 च्या कलम 80 C अंतर्गत येते. याअंतर्गत प्रीमियम भरणाऱ्यांना 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळू शकते.
पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतरही संरक्षण
या पॉलिसीचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे जर पॉलिसीधारकाचा (वडील) दुर्दैवाने मॅच्युरिटी कालावधीपूर्वी मृत्यू झाला तर कुटुंबाला 10 लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळते आणि त्यांना पुढील प्रीमियम भरावा लागत नाही. पॉलिसीचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर नॉमिनी व्यक्तीला 27 लाख रुपयांची संपूर्ण रक्कम दिली जाते.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे जमा करावी लागतील. यामध्ये तुमचे आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, निवास प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मुलीचा जन्म दाखला यांचा समावेश आहे.
Personal Finance सीरीजमधील या बातम्याही वाचा:
1. Personal Finance: शेअर बाजाराची भीती वाटते? तर Gold ETF मध्ये गुंतवा पैसे, 10 हजार रुपयात व्हाल करोडपती!
2. पैसा-पाणी: भारतीयांना सोन्याचं व्यसन, सरकारने मानली हार.. 3 मोठ्या योजना अपयशी!
3. Personal Finance: ATM मधून पैसे काढणे होणार महाग, 1 मे पासून मोजावे लागणार 'एवढे' पैसे
4. Personal Finance: घर खरेदी करावं की भाड्याने घ्यावं.. काय चूक, काय बरोबर? 'हा' फॉर्म्युला ठेवा लक्षात?
5. Personal Finance तुम्हाला मिळतील 4 कोटी, फक्त SNP हा प्लॅन ठेवा लक्षात.. हाती येईल प्रचंड पैसा!
6. Personal Finance: FD पेक्षा जास्त मिळतील पैसे, 'ही' जबरदस्त योजना तुम्हाला माहिती आहे का?
7. Personal Finance: जर तुम्हाला घरबसल्या PF चे पैसे हवे तर फक्त 'एवढंच' करा.., थेट तुमच्या खात्यात पैसे
8. गुड न्यूज: तुमचा घराचा हप्ता होणार कमी, EMI भरताना 'एवढे' पैसे वाचणार!
9. Personal Finance: शेअर मार्केटचा बाजारच उठला, आता करावं तरी काय?
10. Personal Finance: ATM वापरलं की, तुमचे पैसे कापले जाणार, 1 मे पासून येणार नियम पाहून ठेवा बरं!
11. Personal Finance: 50,000 रुपये पगार असलेली लोकंही बनू शकतात करोडपती, फक्त 300...
12. Personal Finance: EPFO कडून मोठा दिलासा, PF मधून काढता येणार 5 लाख... तेही थेट UPI आणि ATM वापरून!
13. Personal Finance: 500 रुपयांच्या मासिक SIP ने किती दिवसांत होऊ शकता कोट्यधीश? संपूर्ण गणित घ्या समजून
14. SIP सारखी जबरदस्त कमाई आणि FD सारखे दर महिन्याला पैसे, SWP प्लॅन नेमका काय?