Personal Finance: SIP गुंतवणुकीत वापरा ही युक्ती, कमवाल 5 कोटी रुपये.. जणू पैशाचा पाऊस!

रोहित गोळे

Personal Finance: SIP मध्ये उत्तम परतावा देणारे फंड हाऊस कोणते आहेत? तुमचे पैसे कसे होतील दुप्पट जाणून घ्या सविस्तरपणे.

ADVERTISEMENT

Personal Finance SIP
Personal Finance SIP
social share
google news

Tips For SIP: मुंबई: सध्या, शेअर बाजार हा मोठा फंड निर्माण करण्यासाठी सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे. पण, घसरत्या आणि वाढत्या शेअर बाजारामुळे अनिश्चितता बरीच वाढली आहे. गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे बुडण्याची चिंता आहे. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदार सुरक्षित आणि हमीदार प्लॅटफॉर्म शोधत आहेत. पण अनेकदा सुरक्षित आणि हमी असलेल्या योजनते तेवढा जास्त रिटर्न मिळत नाही. जेव्हा फंड मॅच्युअर होईल तेव्हा त्या पैशाचे मूल्य त्या काळातील चलनवाढीच्या दराच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी होईल. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदार अशा प्लॅटफॉर्मच्या शोधात आहेत जिथे कमी जोखीम घेऊन निवृत्तीपर्यंत मोठा फंड निर्माण करता येईल.

30 वर्षांचा अभिजीत देखील असाच काहीसा विचार करत आहे. त्यांचा असा विश्वास आहे की जर आजपासून 30 वर्षांनी कोट्यवधींचा फंड तयार केला नाही तर त्या काळातील खर्च भागवणे आव्हानात्मक होईल. जर या खर्चाची योग्य व्यवस्था केली नाही तर म्हातारपण देखील वेदनादायक होईल. अशा परिस्थितीत, अभिजीत एसआयपी (Systematic Investment Plan) मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत आहेत.

SIP साठी 3 सर्वात महत्वाच्या गोष्टी

  • SIP साठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सातत्य असणे.
  • बाजारातील ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्याकडे दुर्लक्ष करणं
  • दीर्घकाळ टिकून राहा.

आता अभिजीतला भेडसावणारी समस्या अशी आहे की, त्याच्याकडे SIP मधील फंडचे निरीक्षण करण्यासाठी, उत्तम परतावा देणाऱ्या फंडची तपासणी करण्यासाठी आणि नियमितपणे त्याच्या पोर्टफोलिओचा आढावा घेण्यासाठी वेळ नाही. तो एका खाजगी कंपनीत काम करतो. त्याला ते पैसे सर्वोत्तम फंड मॅनेजरकडे सोपवायचे आहेत. जेणेकरून त्याला उत्तम परतावा मिळेल. तर चला तर मग आम्ही तुम्हाला गेल्या 5 वर्षात उत्कृष्ट परतावा देणाऱ्या सर्वोत्तम फंड मॅनेजर्सबद्दल सांगणार आहोत. त्याविषयी जाणून घ्या.

SIP प्लॅन

  • अभिजीतचे वय: 30 वर्षे
  • गुंतवणुकीचा कालावधी: 30 वर्षे
  • गुंतवणूक रक्कम: दरमहा 10,000 रुपये
  • निवृत्तीनंतर तुम्हाला किती मिळेल: चला कॅलक्युलेशन करूया

2 कॅटेगरीमध्ये परताव्याचा अंदाज

  • SIP मध्ये सरासरी परतावा: 12% म्हणजेच ₹3.50 कोटीचा फंड
  • SIP मध्ये सरासरी सर्वाधिक परतावा: 14% ₹5.50 कोटींचा मोठा फंड

अभिजीतने इथे कोणतीही लॉटरी खेळलेली नाही. त्याने 30 वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने आपले पैसे गुंतवले आहेत. त्याने उत्तम परतावा देणारा असा फंड मॅनेजर शोधला. त्याने अनेक वेगवेगळ्या फंड हाऊसमध्ये पैसे गुंतवले आहेत. अभिजीतने हे सगळं कसं केलं? चला सगळं जाणून घेऊया...

अभिजीतने हे 3 उत्तम फंड निवडले

1- मिराए अॅसेट इमर्जिंग ब्लूचिप फंड (Mirae Asset Emerging Bluechip Fund)

  • फंड मॅनेजर: नीलेश सुराणा
  • श्रेणी: लार्ज आणि मिडकॅप (Large & Midcap)
  • 5 वर्षांचा परतावा: 21-23%

का निवडला: लॉन्ग टर्ममध्ये मजबूत वाढ

2- आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड (ICICI Prudential Balanced Advantage Fund)

  • फंड मॅनेजर: शंकरन नरेन
  • श्रेणी: Hybrid (Equity + Debt)
  • 5 वर्षांचा परतावा: 11-13%

का निवडला: बाजारातील मंदीपासून संरक्षण करते.

3. पराग पारेख फ्लेक्सी कॅप फंड (Parag Parikh Flexi Cap Fund)

  • फंड मॅनेजर: राजीव ठक्कर
  • श्रेणी: फ्लेक्सिकॅप (Flexicap)
  • 5 वर्षांचा परतावा: 18-20%

का निवडलं: भारतीय + अमेरिकन स्टॉकचा उत्कृष्ट समतोल.

अभिजीतने SIP कशी सुरू केली?

  • KYC केल (पॅन कार्ड + आधारसह)
  • Groww App वरून SIP सुरू केली.
  • याशिवाय, तुम्ही Zerodha Coin, ET Money यापासून देखील सुरुवात करू शकता.
  • अभिजीतने त्याचे पैसे या 3 फंडमध्ये विभागले.
  • ऑटो डेबिट सेट करा
  • आता दरमहा SIP आपोआप तुमच्या बँक खात्यातून कापला जाईल.

Personal Finance सीरीजमधील या बातम्याही वाचा:

1. Personal Finance: शेअर बाजाराची भीती वाटते? तर Gold ETF मध्ये गुंतवा पैसे, 10 हजार रुपयात व्हाल करोडपती!

2. पैसा-पाणी: भारतीयांना सोन्याचं व्यसन, सरकारने मानली हार.. 3 मोठ्या योजना अपयशी!

3. Personal Finance: ATM मधून पैसे काढणे होणार महाग, 1 मे पासून मोजावे लागणार 'एवढे' पैसे

4. Personal Finance: घर खरेदी करावं की भाड्याने घ्यावं.. काय चूक, काय बरोबर? 'हा' फॉर्म्युला ठेवा लक्षात?

5. Personal Finance तुम्हाला मिळतील 4 कोटी, फक्त SNP हा प्लॅन ठेवा लक्षात.. हाती येईल प्रचंड पैसा!

6. Personal Finance: FD पेक्षा जास्त मिळतील पैसे, 'ही' जबरदस्त योजना तुम्हाला माहिती आहे का?

7. Personal Finance: जर तुम्हाला घरबसल्या PF चे पैसे हवे तर फक्त 'एवढंच' करा.., थेट तुमच्या खात्यात पैसे

8. गुड न्यूज: तुमचा घराचा हप्ता होणार कमी, EMI भरताना 'एवढे' पैसे वाचणार!

9. Personal Finance: शेअर मार्केटचा बाजारच उठला, आता करावं तरी काय?

10. Personal Finance: ATM वापरलं की, तुमचे पैसे कापले जाणार, 1 मे पासून येणार नियम पाहून ठेवा बरं!

11. Personal Finance: 50,000 रुपये पगार असलेली लोकंही बनू शकतात करोडपती, फक्त 300...

12. Personal Finance: EPFO कडून मोठा दिलासा, PF मधून काढता येणार 5 लाख... तेही थेट UPI आणि ATM वापरून!

13. Personal Finance: 500 रुपयांच्या मासिक SIP ने किती दिवसांत होऊ शकता कोट्यधीश? संपूर्ण गणित घ्या समजून

14. SIP सारखी जबरदस्त कमाई आणि FD सारखे दर महिन्याला पैसे, SWP प्लॅन नेमका काय?

हे वाचलं का?

    follow whatsapp