Aditya L1 ने काढला पहिला सेल्फी, चंद्र आणि पृथ्वीचा टिपला सुंदर फोटो

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

aditya l1 took first selfi earth and moon isro share update in social media
aditya l1 took first selfi earth and moon isro share update in social media
social share
google news

Aditya L1 Mission Update : चांद्र मोहिमेच्या यशानंतर आता इस्त्रोने सुर्य मोहिम म्हणजे आदित्य L1 मिशनला सुरुवात केली आहे. या मोहिमेत आदित्य L1ने आता एक सेल्फी काढला आहे. या सेल्फीत आदित्य L1ने चंद्र आणि पृथ्वीचे सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत आदित्य L1 ने कॅमेरातून एक व्हिडिओ देखील काढला आहे. या व्हिडिओत चंद्र आणि पृथ्वीचा अद्भूत नजारा दिसतोय. या संबंधित माहिती आता इस्त्रोने एक्स या सोशल माध्यमावरून दिली आहे. (aditya l1 took first selfi earth and moon isro share update in social media)

ADVERTISEMENT

इस्त्रोने 2 सप्टेंबरला श्रीहरीकोटा येथील स्पेस सेंटरमधून आदित्य L1 लाँच केले होते. हा आदित्य L1 सध्या पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये फेऱ्या मारतोय. या दरम्यान आदित्य L1वर लावण्यात आलेल्या कॅमेराने एक सेल्फी घेतला आहे. या सेल्फीत आदित्य L1 वर लावण्यात आलेले दोन पेलोड्स VELC आणि SUIT व्यवस्थितरीत्या दिसत आहेत. यासोबतच आदित्य L1 पृथ्वी आणि चंद्राचा एक व्हिडिओ देखील बनवला आहे. हा व्हिडिओ 4 सप्टेंबरचा आहे. एकूणच आदित्य L1ने ही माहिती शेअर करून त्याच्यावर लावण्यात आलेली उपकरणे व्यवस्थित काम करत असल्याची माहिती दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : India-Bharat : 74 वर्षांपूर्वी कसं ठरलं देशाचे नाव? आंबेडकरांची भूमिका ठरली महत्त्वाची

आदित्य-एल1 हे हॅलो ऑर्बिटमध्ये (Halo Orbit) मध्ये ठेवण्यात येईल. L1 बिंदू हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यात स्थित आहे. पण सूर्यापासून पृथ्वीच्या अंतराच्या तुलनेत ते फक्त 1 टक्के आहे. या प्रवासात 127 दिवस लागणार आहेत. हे अवघड यासाठी आहे, कारण त्याला दोन मोठ्या कक्षेत जावे लागणार आहे. पहिली अवघड कक्षा म्हणजे पृथ्वीच्या SOI च्या बाहेर जाणे. कारण पृथ्वी आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीने आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट खेचते. यानंतर क्रुज टप्पा येतो आणि हॅलो ऑर्बिटमध्ये L1 स्थान प्राप्त होते. जर या ठिकाणी वेग नियंत्रित केला नाही तर तो थेट सूर्याकडे जाईल आणि जळून खाक होईल.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Maratha Reservation : मनोज जरांगेंनी निर्णयाची केली पोलखोल, शिंदे सरकार काय करणार?

ADVERTISEMENT

आदित्य L1च्या माध्यमातून सूर्याचे वातावरण आणि चुंबकीय क्षेत्राची माहिती गोळा करेल. त्यात 7 पेलोड बसवण्यात आले आहेत. जे सूर्याची किरणं आणि त्यातून निघणारे रेडिएशन, सोलर वादळ, फ्लेअर्स आणि कोरोनल मास इजेक्शन (CME) यांचा अभ्यास करतील. याशिवाय सूर्याचे इमेजिंग केले जाणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT