October महिन्याची सुरुवात पुन्हा सुट्ट्यांपासून… बॅंकेत 16 दिवस कामकाज राहणार बंद!
उद्यापासून (01 October) ऑक्टोबर महिना सुरू होत आहे आणि प्रत्येक वेळी प्रमाणे, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ऑक्टोबर 2023 मध्ये येणाऱ्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, सणांनी भरलेल्या पुढील महिन्यात एकूण 16 बँकिंग सुट्ट्या आहेत.
ADVERTISEMENT
Bank Holidays In October 2023 : उद्यापासून (01 October) ऑक्टोबर महिना सुरू होत आहे आणि प्रत्येक वेळी प्रमाणे, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ऑक्टोबर 2023 मध्ये येणाऱ्या बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, सणांनी भरलेल्या पुढील महिन्यात एकूण 16 बँकिंग सुट्ट्या आहेत. यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. (Banks will be closed for 16 days in october Know the list of holidays)
ADVERTISEMENT
सुट्ट्यांनी ऑक्टोबर महिन्याची सुरूवात!
सप्टेंबर महिन्यात गणेश चतुर्थी, जन्माष्टमी, ईद यासह अनेक सणांमुळे भरपूर सुट्ट्या आल्या होत्या. आता ऑक्टोबर महिन्यातही अनेक सण एकामागून एक येत आहेत. ऑक्टोबरमध्ये, आरबीआयने गांधी जयंती, दुर्गापूजा ते दसरा या प्रसंगी बँकांना सुटी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे महिन्याची सुरुवात सुट्टीने होत आहे. 1 ऑक्टोबरला रविवार आणि 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीची सुट्टी असते.
Video : खऱ्याखुऱ्या बंदुकीशी खेळ अन् अचानक सुटली गोळी, चिमुकलीचा…
आरबीआयची यादी पाहूनच बँकेच्या कामकाजासाठी पडा बाहेर…
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ऑक्टोबर 2023 साठी जाहीर केलेली बँक सुट्टीची यादी पाहिल्यास, महिन्याच्या 1, 8, 14, 15, 22, 28 आणि 29 तारखेला रविवारची साप्ताहिक सुट्टी असेल. तसंच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असेल. सेंट्रल बँक देशातील विविध राज्यांमध्ये होणारे सण आणि कार्यक्रम लक्षात घेऊन बँक हॉलिडे लिस्ट तयार करते आणि या राज्यांमध्ये या बँकिंग सुट्ट्या वेगळ्या असू शकतात.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
अशावेळी, तुम्ही बँकिंगचे कोणतेही काम करण्याचे नियोजन असाल तर ही यादी जरूर तपासा, नाहीतर बँकेत जाल आणि तुमचाच वेळ वाया जाईल. तुम्ही (https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx) वर क्लिक करून तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरद्वारे आरबीआयने जारी केलेली यादी पाहू शकता.
Crime : हाताची बोट छाटली, मुंडकं धडावेगळे…अनैतिक संबंधातून भयंकर हत्याकांड
ऑक्टोबर महिन्यातील बँकेच्या सुट्ट्यांची यादी
- 1 ऑक्टोबर 2023 (रविवार)
- 2 ऑक्टोबर 2023 (सोमवार)- गांधी जयंती
- 8 ऑक्टोबर 2023 (रविवार)
- 14 ऑक्टोबर 2023 (दुसरा शनिवार) – महालय-कोलकाता येथे बँका बंद राहतील.
- 15 ऑक्टोबर 2023 (रविवार)
- 18 ऑक्टोबर 2023 (बुधवार) – काटी बिहू – आसाममध्ये बँका बंद राहतील.
- 21 ऑक्टोबर 2023 (शनिवार) – दुर्गा पूजा (महा सप्तमी) – पश्चिम बंगाल, त्रिपुरा, आसाम आणि मणिपूरमध्ये बँका बंद.
- 22 ऑक्टोबर 2023 (रविवार)
- 23 ऑक्टोबर 2023 (सोमवार) – महानवमी, आयुधा पूजा, दुर्गा पूजा – बिहार, झारखंड, आसाम, त्रिपुरा, कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये बँका बंद राहतील.
- 24 ऑक्टोबर 2023 (मंगळवार) – दसरा म्हणजेच विजयादशमी, दुर्गा पूजा – आंध्र प्रदेश, मणिपूर वगळता सर्व राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
- 25 ऑक्टोबर 2023 (बुधवार) – दुर्गा पूजा (दसैन) – सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.
- 26 ऑक्टोबर 2023 (गुरुवार) – दुर्गा पूजा (दसैन) / विलीनीकरण दिवस – जम्मू आणि काश्मीर आणि सिक्कीममध्ये बँका बंद.
- 27 ऑक्टोबर 2023 (शुक्रवार) – दुर्गा पूजा (दसैन) – सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.
- 28 ऑक्टोबर 2023 (शनिवार) – लक्ष्मी पूजा – पश्चिम बंगालमध्ये बँका बंद राहणार आहेत.
- 29 ऑक्टोबर 2023 (रविवार)
- 31 ऑक्टोबर 2023 (मंगळवार) – सरदार वल्लभभाई पटेल जयंती – गुजरातमध्ये बँका बंद राहतील.
Satara: खून करुन फरार.. तब्बल 36 वर्षानंतर सापडला आरोपी, अंगावर काटा आणणारी घटना
बँकिंगचे काम ऑनलाइन करता येणार
बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमध्ये होणाऱ्या इतर कार्यक्रमांवरही अवलंबून असतात. याचा अर्थ ते राज्य आणि शहरांमध्ये भिन्न आहेत. तसंच, बँकेच्या शाखा बंद असूनही, तुम्ही तुमचं काम ऑनलाइन घर बसल्या करू शकता. ही सुविधा 24 तास उपलब्ध असते. तुम्ही ऑनलाइन व्यवहारासारखी कामे सहज पूर्ण करू शकता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT