Udayanraje Bhosale: दोन्ही राजांमध्ये असं काय घडलं… की, फडणवीसांनी गाठलं थेट सातारा!

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

shivendra raje vs udayan raje krushi utpann bazar samiti devendra fadnavis reach satara
shivendra raje vs udayan raje krushi utpann bazar samiti devendra fadnavis reach satara
social share
google news

सातारा: सातारा (Satara) शहरालगत काल (21 जून) सकाळी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या इमारतीचे भूमिपूजनासाठी टाकलेल्या मंडपाची मोडतोड करत कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न खा. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या समर्थकांनी केला आहे. या घटनेनंतर साताऱ्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ज्यानंतर घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान, आ. शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje bhosale) यांनीही तेथे जाऊन तळ ठोकला होता. याच सगळ्या वादावादीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना थेट साताऱ्याला धाव घ्यावी लागली आहे. (bjp mp udayanraje bhosale disrupted program mla Shivendraraje bhosale politics satara dcm devendra fadnavis)

ADVERTISEMENT

उदयनराजे-शिवेंद्रराजे भोसलेंमध्ये नेमकं घडलं तरी काय?

याबाबत अधिक माहिती अशी, आ. शिवेंद्रराजे भोसले यांची सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत एकहाती सत्ता आहे. सध्या ही इमारत सातारा एसटी परिसरात आहे. नव्या इमारतीसाठी शहरालगत खिंडवाडी येथे जागा निश्चित करण्यात आली होती. ज्यासाठी भूमिपूजनचा कार्यक्रम आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थित होणार होता.

हे ही वाचा >> Pune : MPSC पास दर्शना पवारला राहुल हंडोरेनेच संपवलं! हत्येचं कारण…

भूमिपूजन सोहळा व त्यानंतर सभा असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. यासाठी परिसरात मोठा मंडप टाकून सजावट देखील करण्यात आली होती. मात्र, बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास खा. उदयनराजे भोसले समर्थकांनी या परिसरात येऊन जोरदार राडा केला. मंडपाचे नुकसान करून तो पाडला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुमारे अर्धा तास परिसरात तणाव होता. दरम्यान, या घटनेची माहिती आ. शिवेंद्रराजे भोसले यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हळूहळू आमदार समर्थकांनी परिसरात गर्दी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस दल अलर्ट झाले व परिसराला छावणीचे रूप आले होते.

हे वाचलं का?

खा. उदयनराजेंसह 50 जणांविरुद्ध गुन्हा

दरम्यान, खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये काल झालेल्या वादावादीनंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात खासदार उदयनराजे यांच्यासह 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांनी जीवे मारण्याची धमकी देऊन 2 लाख रुपये किंमतीच्या साहित्याचे नुकसान केले असल्याचे आमदार शिवेंद्रराजे समर्थक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, संशयितामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, माजी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा समावेश आहे.

हे ही वाचा >> Ajit Pawar: अजितदादा म्हणाले मला पक्षात पद द्या, शरद पवारांनी थेट…

खा. उदयनराजे, विनीत पाटील, अजय मोहिते, सनी भोसले, अमोल तांगडे, पंकज चव्हाण, स्वप्नील घुसाळे, गणेश जाधव, पंकज मिसाळ, सतीश माने, जितेंद्र खानविलकर, सोमनाथ उर्फ काका धुमाळ, अभिजित मोहिते, समीर माने, राहुल गायकवाड, सुभाष मगर, किशोर शिंदे यांच्यासह 50 जणांविरुद्ध बेकायदा जमाव जमवणे, दमदाटी करून नुकसान करणे यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीसांनी घेतली साताऱ्यात धाव

दरम्यान, एकाच पक्षाचे आमदार-खासदार असलेल्या दोन्ही राजे आमनेसामने आल्याने साताऱ्यात नवा वाद निर्माण झाला आहे. या वादाचा आगामी निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो.. याची जाणीव झाल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ साताऱ्यात धाव घेऊन या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोघांनाही स्वतंत्रपणे भेटले आणि त्यांच्याशी तास-तासभर चर्चाही केली. आता या चर्चेनंतर तरी दोन्ही राजेंमधील वाद मिटणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT