Chandrayaan 3 Lander Module Separation : चांद्रयानचे होणार दोन तुकडे! कसा असणार पुढील प्रवास?
आज पहाटे या चंद्रयान 3 ने चंद्राच्या पाचव्या कक्षेत प्रवेश केला होता. आता उद्याचा 17 ऑगस्टचा दिवस देखील चंद्रयानसाठी खूप महत्वाचा आहे. कारण चंद्रयान 3 चे लँडर आणि प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे होणार आहेत. यानंतर चंद्रयानच्या सॉप्ट लँडिगची प्रक्रिया सुरु होणार आहे.
ADVERTISEMENT
Chandrayaan 3 Lander Module Separation : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)इस्त्रोची महत्वाकांक्षी मोहिम असलेलं चंद्रयान 3 ने 14 जुलैला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आकाशात उड्डाण केले होते. आता हे चंद्रयान 3 अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचले आहे. चंद्राच्या पुष्ठभागावर उतरायला चंद्रयान 3 ला अवघा आठवडा उरला आहे. आज पहाटे या चंद्रयान 3 ने चंद्राच्या पाचव्या कक्षेत प्रवेश केला होता. आता उद्याचा 17 ऑगस्टचा दिवस देखील चंद्रयानसाठी खूप महत्वाचा आहे. कारण चंद्रयान 3 चे लँडर आणि प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे होणार आहेत. यानंतर चंद्रयानच्या सॉप्ट लँडिगची प्रक्रिया सुरु होणार आहे. (Chandrayaan 3 Lander Module Separation breaks parts separation of propulsion module lander module 17 aug)
ADVERTISEMENT
चंद्रयान 3 ने आज 16 ऑगस्टला चंद्राच्या पाचव्या कक्षेत प्रवेश केला होता.चंद्रयान 3 ने 153 किमी x 163 किमीच्या पाचव्या कक्षेत ठेवण्यात आले आहे. या प्रक्रियेचे नाव मॅन्युव्हर आहे. या अंतर्गत अंतराळ यानाच्या इंजिनचा वापर करून ते एका विशिष्ट मार्गाने ढकलेल जात, ज्यामुळे त्याचा मार्ग अधिक गोलाकार बनतो. दरम्यान 17 ऑगस्टचा दिवस देखील या मोहिमेसाठी महत्वाचा असणार आहे. कारण 17 ऑगस्टला प्रोपल्शन आणि लँडर माड्यूल वेगळे केले जाणार आहे. लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाल्यानंतर अंतराळयान 100 किमी x 30 किमीच्या कक्षेत पोहोचल्यानंतर सॉफ्ट लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल.
हे ही वाचा : NCP चा नेमका अध्यक्ष कोण? शरद पवारांकडे मागितले ‘पुरावे’, फक्त ‘एवढीच’ मुदत
23 ऑगस्टला सॉफ्ट लँडिंग
प्रोपल्शन आणि लँडर माड्यूल वेगळे झाल्यानंतर सॉफ्ट लँडिंगची प्रक्रिया सुरू होते. लँडर आपल्या थ्रस्टर्सचा वापर करून चंद्राच्या पृष्ठभागावर सुमारे 30 किमी उंचीवर पोहोचतो. त्याच्या सुरक्षित लँडिंगसाठी अचूक नियंत्रण आणि नेव्हिगेशन आवश्यक आहे. यानंतर लँडर मॉड्यूल 18 ऑगस्ट रोजी दुपारी 4.45 ते 4.00 या दरम्यान डि-ऑर्बिटिंग करेल. यामुळेच त्याच्या कक्षेची उंची कमी होईल. 20 ऑगस्ट रोजी, चांद्रयान-3 चे लँडर मॉड्यूल पहाटे 2.45 वाजता डी-ऑर्बिटिंग करेल. 23 ऑगस्ट रोजी लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल. जर सर्व काही ठीक झाले तर लँडर साडेसहा वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
चांद्रयान-3 चा अजून किती प्रवास बाकी?
14 ऑगस्ट 2023: पहाटे बारा ते 12:04 पर्यंत चौथी कक्षा बदलली.
16 ऑगस्ट 2023: सकाळी 8:38 ते 8:39 दरम्यान, पाचवी कक्षा बदलली.याचाच अर्थ, चांद्रयानाचे इंजिन फक्त एका मिनिटासाठी चालू राहतील.
17 ऑगस्ट 2023: चांद्रयान-3 चं प्रोपल्शन आणि लँडर मॉड्यूल वेगळे होतील. त्याच दिवशी, दोन्ही मॉड्यूल चंद्राभोवती 100 किमी x 100 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत असतील.
18 ऑगस्ट 2023: लँडर मॉड्यूलचे डीऑर्बिटिंग दुपारी 4.45 ते 4.00 दरम्यान होईल. म्हणजेच त्याच्या कक्षेच्या उंची कमी होईल.
20 ऑगस्ट 2023: चांद्रयान-3 चे लँडर मॉड्यूल रात्री पावणे दोन वाजता डि-ऑर्बिटिंग करेल.
23 ऑगस्ट 2023: लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल. जर सर्व काही ठीक राहिले तर लँडर साडेसहा वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
हे ही वाचा : राहुल गांधी फिरोज खानची पिलावळ, शरद पोक्षेंनी तोडले अकलेचे तारे
चांद्रयान-3 वर ISTRAC कडून सतत देखरेख!
चांद्रयान-3 चे बंगळुरूमधील इस्रोच्या सेंटर टेलीमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (ISTRAC) च्या मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स (MOX) मधून सतत निरीक्षण केले जात आहे. सध्या चांद्रयान-३ ची सर्व उपकरणे व्यवस्थित काम करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT