Chhagan Bhujbal : “काय त्याचे लाड चाललेत…”, जरांगेंवर बाण, भुजबळांचा सरकारला इशारा
Chhagan bhujbal vs manoj jarange : शिंदे सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीबद्दल बोलताना छगन भुजबळ यांनी नाराजीचा सूर लावला. ते नेमकं काय म्हणाले वाचा?
ADVERTISEMENT
Chhagan Bhujbal on Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला होता. ही वेळ संपत आल्याने शनिवारी (16 डिसेंबर) सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. गिरीश महाजन, संदीपान भुमरे यांनी जरांगेंसोबत चर्चा केली आणि वेळेचा आग्रह धरू नये, अशी विनंती केली. सरकारचे शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात झालेल्या भेटीवर बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनीही इशारा दिला.
ADVERTISEMENT
नागपूर येथे माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “मला काही कल्पना नाही. थ्रोट इन्फेक्शनमुळे डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं. त्यामुळे मी आज दिवसभर आराम करत होतो. आता तुमच्याकडून कळलं. ठीक आहे, ते गेले असतील”, असे भुजबळ यांनी सांगितलं.
त्याच्या नादी कोण लागतंय? भुजबळांचा उलट सवाल
सरकारच्या शिष्टमंडळासोबत बोलताना मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांकडून होणाऱ्या टीकेचा उपस्थित केला होता. त्याबद्दल प्रश्न विचारताच भुजबळ म्हणाले, “कुणाच्या नादी लागू नका, त्याच्या (मनोज जरांगे)? त्याच्या नादी कोण लागतंय? आम्ही जे आहे, ते आमच्या ओबीसींवर कुणीही आक्रमण करायचं नाही. हा आमचा लढा आहे. तुम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. आमचा विरोध नाही”, असा पुर्नरुच्चार भुजबळ यांनी नागपूर येथे बोलताना केला.
हे वाचलं का?
हेही वाचा >> ‘चहा प्यायला रूपया नाही’, अमोल शिंदेच्या कुटुंबियांची कशी आहे अवस्था?
राज्यात 54 टक्के ओबीसी -भुजबळ
“तो विनाकारण… घेईन तर ओबीसीतूनच घेईन. काय त्याचे लाड चाललेत कळत नाही, परंतु या राज्यामध्ये 54 टक्के लोक ओबीसी आणि बाकीचे सगळे मागासवर्गीय आहेत. हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. अशा रितीने कुठल्याही लहान समाजावर अन्याय करत असतील, महाराष्ट्रातील विचारवंत मग मराठा सुद्धा त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही”, असं भुजबळ म्हणाले.
हेही वाचा >> ठाकरेंचा फडणवीसांवर जोरदार हल्ला, ‘तुम्ही अदानीचं बूट चाटताय’
54 लाख नोंदी सांगितल्याचा मुद्द्यावर भुजबळ म्हणाले, “ते बघुयात… खरं खोटं बाहेर पडेल ना? आमचा लढा शेवटपर्यंत सुरू राहील. जोपर्यंत आमच्यावरील आक्रमण दूर होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील.”
ADVERTISEMENT
शिंदे सरकारला भुजबळांनी काय दिला इशारा?
24 तारखेला बैठक घेऊ आणि त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरवू असे मनोज जरांगे म्हणाले आहेत. त्यावर भुजबळ म्हणाले, “त्यांना काय करायचं, ते ते करतील. आम्हाला काय करायचं ते आम्ही करू. सरकारला काय करायचं ते सरकार करेल”, अशी भूमिका मांडतानाच भुजबळ म्हणाले की, “सरकारच्या कामावर जरांगे समाधान व्यक्त करणार, पण आमच्यावर आक्रमण झालं तर आम्ही असमाधान व्यक्त करू”, असा इशारा त्यांनी शिंदे सरकारला दिला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT