Maratha Reservation : ‘या’ मराठा व्यक्तीला मिळालं पहिलं कुणबी जात प्रमाणपत्र
Maratha Reservation Kunbi Caste Certificate : कुणबी जात प्रमाणपत्र वाटपाचे काम सुरू झाले आहे. धाराशिव जिल्ह्यातील सुमित माने या मराठा व्यक्तीला मिळालं कुणबी म्हणून जात प्रमाणपत्र.
ADVERTISEMENT
Maratha Reservation kunbi caste Certificate : निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीने प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर शिंदे सरकारने वंशावळीत कुणबी उल्लेख असलेल्या मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, महाराष्ट्रात पहिल्या कुणबी जातप्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. धाराशिव जिल्ह्यातील कारी गावातील मराठा व्यक्तीला पहिले कुणबी जातप्रमाणपत्र देण्यात आलं. (Kunbi Maratha Caste Certificate Distribution Started in Maharashtra)
ADVERTISEMENT
मराठवाड्यातील मराठा समाज हा कुणबीच आहे. त्यांना कुणबी म्हणून जात प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत सरकारने निजाम काळात कुणबी म्हणून उल्लेख असलेल्या वा महसूली नोंदीमध्ये कुणबी असा उल्लेख असलेल्यांना जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.
हे ही वाचा >> Maratha Reservation : “मी त्याला फाडून खाईन”, आमदार गायकवाडांचं धक्कादायक विधान
या समितीने प्राथमिक अहवाल दिल्यानंतर ज्यांच्याकडे कुणबी असल्याची वंशावळ वा महसूल नोंदीचे पुरावे आहेत, त्यांना जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
कोणत्या मराठा व्यक्तीला मिळालं पहिलं कुणबी जात प्रमाणपत्र?
धाराशिव तालुक्यातील कारी या गावातील सुमित भारत माने या पात्र मराठा व्यक्तीला कुणबी जातप्रमाण देण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बसे यांच्या हस्ते हे जात प्रमाणपत्र देण्यात आले.
कुठल्या आधारावर मिळालं कुणबी जात प्रमाणपत्र?
सुमित माने या लाभार्थी व्यक्तीचे पंजोबा कृष्णा दादा माने यांचे गाव नमुना 14 वरील 1917 मध्ये कुणबी असल्याचा पुरावा सापडला आहे. त्या आधारावर कुणबी म्हणून जात प्रमाणपत्र देण्यात आले आहे. महसूल प्रशासनानेच हा पुरावा शोधला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> ‘हल्ला झाला तेव्हा माझी पत्नी, मुलं…’, संदीप क्षीरसागरांनी सांगितलं हल्लेखोर कोण?
धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाने 40 लाख कागदपत्रे तपासली. त्यात 459 प्रकरणात मराठा कुणबी पुरावे आढळून आले आहेत. सुमित माने याचं वय 30 वर्ष असून, BCA पदवीचे शिक्षण घेतले आहे. ते शेती करतात. माने यांना दोन भाऊ आहेत. त्यांच्या एका भावाचे कृषी विषयात एमबीए झाले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT