पोलिसांने केलं असं काही की अंगावर येईल काटा! सापाचा तोंडाने CPR देऊन वाचवला जीव, Video व्हायरल
मध्य प्रदेशातील कॉन्स्टेबल अतुल शर्मा यांनी सीपीआर देऊन चक्क धामण प्रजातीच्या सापाचा जीव वाचवला. अतुल यांनी एका बेशुद्ध सापाला वाचवले.
ADVERTISEMENT
Snake Viral Video: CPR बद्दल तुम्ही ऐकलंच असेल. हे एक तंत्र आहे ज्यामध्ये एखाद्या बेशुद्ध व्यक्तीच्या तोंडात हवा फुंकली जाते. यामुळे श्वास घेण्यास मदत होते आणि त्याचा जीव वाचू शकतो. हे मानवांमध्ये सामान्य आहे, परंतु जेव्हा सापाला तोंडाने सीपीआर दिल्याचं कळतं तेव्हा अंगावर काटच येतो. (Madhya Pradesh News police Constable saved life of unconscious Snake by giving cpr)
ADVERTISEMENT
मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील सेमारी हरिचंद पोलीस चौकीवर तैनात असलेले कॉन्स्टेबल अतुल शर्मा यांनीही असंच काहीसं केलं आहे. अतुल शर्मा यांनी सीपीआर देऊन चक्क धामण प्रजातीच्या सापाचा जीव वाचवला. अतुल यांनी एका बेशुद्ध सापाला वाचवले, नंतर त्याचे तोंड उघडले आणि त्याच्या तोंडातून हवा भरली. त्यामुळे सापाने पुन्हा श्वास घेण्यास सुरुवात केली आणि अखेर त्याचा जीव वाचला.
वाचा: Gunaratna Sadavarte यांच्या गाड्या बीडमधील तरुणांनी फोडल्या, सरपंचाला अटक
कॉन्स्टेबल अतुल या सापाला सीपीआर देत असल्याचा व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये ते बेशुद्ध सापाचे तोंड उघडून त्याला सीपीआर देताना दिसत आहेत.
नेमकं घडलं काय होतं?
साप पाईपमध्ये अडकला होता आणि त्याच्यावर कीटकनाशक पाणी टाकल्यामुळे तो बेशुद्ध झाला आणि त्याला श्वास घेता येत नव्हता. ही माहिती मिळताच कॉन्स्टेबल अतुल शर्मा यांनी सापाला सीपीआर दिल्याने त्याचा जीव वाचला.
वाचा: दुर्गामातेबद्दल You tuber ची असभ्य भाषा, भक्तांनी चिडून…
अतुल बारावीपासून सापांचे प्राण वाचवत आहेत
कॉन्स्टेबल अतुल शर्मा यांनी सांगितले की, ते 12वीत असल्यापासून सापांना वाचवत आहेत. दसऱ्या दिवशी (24 ऑक्टोबर) रेल्वे स्थानकाजवळील तवा कॉलनीत एका घरात साप शिरल्याची माहिती मिळाल्यावर ड्युटीवर असलेले अतुल शर्मा तिथे पोहोचले. मात्र पाईपमध्ये अडकलेल्या सापापर्यंत पोहोचण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी पाईपमध्ये कीटकनाशकाचे औषध टाकले होते.
ADVERTISEMENT
वाचा: Surat Diamond Bourse: गुजराती व्यापाऱ्यांचा मुंबईला प्रचंड मोठा धक्का, ‘हिरा’ व्यापार हिरावला!
यामुळे साप बेशुद्ध झाला होता. कॉन्स्टेबल अतुल यांनी आधी पाणी शिंपडून सापाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला आणि नंतर सीपीआर दिला, त्यामुळे साप शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी सापाला पाणी देऊन सुरक्षित जंगलात सोडले. सीपीआर देऊन त्यांनी वाचवलेला साप धामण प्रजातीचा असून हे साप विषारी नसतात.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT