Manipur : ‘जिवंत राहायचं असेल, तर कपडे काढ’, ‘त्या’ पीडितेने सगळंच सांगितलं
मणिपूरमध्ये मे महिन्यात महिलांची नग्न धिंड काढल्याची घटना घडली. या घटनेची एक व्हिडीओ क्लिप आता समोर आलीये. त्यानंतर याचे देशभरात तीव्र पडसाद उमटले.
ADVERTISEMENT
Manipur viral video Story : मणिपूरमधील एका व्हिडीओने देश सून्न झाला. तीन महिलांसोबत जमावाने अत्यंत हीन आणि संतापजनक कृत्य केले. त्यांना नग्न व्हायला भाग पाडलं आणि त्यांची धिंड काढली. जमावाने पोलिसांच्या समोरच त्यांना घेरलं. पोलिसांसमोरच त्यांना कपडे काढण्यासाठी धमकी दिली गेली. हा सगळा घटनाक्रम हादरवून टाकणार आहे. याच घटनेतील एका पीडितेने व्हिडीओत कैद न झालेली सगळी आपबीती सुनावली आहे.
ADVERTISEMENT
मणिपूरमध्ये मे महिन्यात महिलांची नग्न धिंड काढल्याची घटना घडली. या घटनेची एक व्हिडीओ क्लिप आता समोर आलीये. त्यानंतर याचे देशभरात तीव्र पडसाद उमटले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, ज्या महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्यात आली, त्यापैकी एकीने तिच्यावर झालेल्या या भयंकर घटनेची कहाणी सांगितली.
पीडितेने काय काय सांगितलं?
मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेतील पीडिता म्हणाली की, ‘मैतेई समुदायातील शेकडो लोकांनी आम्हाला रोखलं. जमावाने रोखल्यानंतर पोलिसही शांत झाले. त्यानंतर जमावातील लोक आम्हा तिघांनी वाईट पद्धतीने हात लावू लागले. त्यानंतर त्या लोकांनी धमकी दिली की, तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल, तर कपडे काढा.’
हे वाचलं का?
वाचा >> Pune Crime : ‘तुलाही गोळी घालेन’, पत्नी-पुतण्याच्या हत्येपूर्वी काय घडलं?
पीडिता पुढे म्हणाली की, ‘असं म्हटल्यानंतर आम्ही पोलिसांकडे बघितलं. कारण आम्हाला वाटलं, पोलीस मदत करतील. पण, पोलिसांनी आमच्याकडे बघितलही नाही. उलट पोलिसांनी दुसरीकडे नजर फिरवली. त्यानंतर जमावाने एका मुलीच्या बापाची हत्या केली. नंतर तिचा 19 वर्षांचा भाऊच तिथे होता. त्याला ओलीस ठेवले.’
वाचा >> दोन्ही राष्ट्रवादींना घसघशीत फायदा! ठाकरे गट, काँग्रेस आमदारांचे हात रिकामे
‘हे सगळं बघून आम्ही लोक खूप घाबरून गेलो. त्यानंतर हे लक्षात आलं की, आपला मृत्यू होणार की जिवंत राहणार, हे हा जमावच ठरवणार आहे. आमच्यासमोर पर्याय नव्हता. डोळ्यात अश्रू आले. आम्ही नजरा खाली केल्या आणि एक एक करून कपडे काढू लागलो’, त्या 42 वर्षीय पीडितेने सांगितलं.
ADVERTISEMENT
जमाव आम्हाला छेडत होता अन् पोलीस दुर्लक्ष करत होती
‘आम्ही लोक पोलिसांच्या सुरक्षेत होते. पोलीस ठाणे 2 किमी अंतरावर होते. त्याचवेळी मैतेई समुदायाच्या जमावाने घेरलं. आम्ही कपडे काढल्यानंतर त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. अंगाला नको तिथे हात लावू लागले. प्रायव्हेट पार्टलाही हात लावत होते. त्यानंतर जंगलात घेऊन गेले. एका शेतात. तिथे मला झोपायला सांगितलं. मी त्यांना विनवणी केली केली. त्यामुळे माझ्या त्यांनी अत्याचार केले नाही. पण, 21 वर्षाच्या मुलीवर खूप साऱ्या लोकांनी सामूहिक बलात्कार केला’, अशी आपबीती पीडित महिलेने सांगितली.
ADVERTISEMENT
21 वर्षीय पीडितेला बसला मोठा धक्का
पीडित महिलेने सांगितलं की, ‘ज्या मुलीवर लोकांनी गँगरेप केला. तिच्यावर या घटनेनं मोठा परिणाम झाला आहे. ती ट्रॉमामध्ये असून, ती कुणाशी बोलत नाहीये. तिला कुणालाही भेटायचंही नाहीये. ती फक्त गावातील प्रमुखासोबत तक्रार देण्यासाठी पोलिसांत गेली होती. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मानसोपचार तज्ज्ञही तिच्यावर उपचार करत आहेत’, असंही या पीडितेने सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT