Shiv Sena: ‘…असे मराठा मुख्यमंत्री आम्हाला नको’, CM शिंदेंना त्यांच्याच नेत्याने ठणकावलं!

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

Shiv Sena: '...असे मराठा मुख्यमंत्री आम्हाला नको', CM शिंदेंना त्यांच्याच नेत्याने ठणकावलं!
Shiv Sena: '...असे मराठा मुख्यमंत्री आम्हाला नको', CM शिंदेंना त्यांच्याच नेत्याने ठणकावलं!
social share
google news

Maratha Reservation Shiv Sena: कल्याण: ‘सरकारचे प्रतिनिधी हे पोलीस आहेत त्यांनी आंदोलन न करण्याकरिता नोटीसा बजावल्या आहेत. पोलीस देखील आरक्षणाच्या बाजूने नाहीत ते सरकारच्या बाजूने असल्याने त्यांनी नोटीस बजावण्याचे धाडस केले आहे. मराठा मुख्यमंत्री असताना मराठयांना नोटीसा देत असतील तर असे मराठा मुख्यमंत्री (Maratha CM) देखील आम्हाला नकोत. सरकारने लवकरात लवकर आरक्षण घोषित केले नाही तर मी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देईल.’ असा इशाराच मराठा क्रांती मोर्चाचे नेते आणि शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे (Arvind More) यांनी दिला आहे. त्यांच्या याच विधानामुळे सर्वांच्याच भुवया आता उंचावल्या आहेत. (maratha reservation we dont want such a maratha chief minister this statement has been made by shiv sena shinde group district chief)

ADVERTISEMENT

दरम्यान, स्वत:च्याच पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने आपल्या पक्षातील सर्वोच्च नेता मुख्यमंत्री नको असं विधान केल्यानंतर आत चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे. म्हणूनच जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून मराठा समाजाकडून पाठिंबा दिला जातो आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज (27 ऑक्टोबर) तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले.

हे ही वाचा>> Maratha Reservation : ‘…याला संपवायला पाहिजे होता’, सदावर्तेंबद्दल शिंदे गटाच्या आमदाराचे खळबळजनक विधान

या साखळी उपोषणात शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे हे देखील सहभागी झाले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोरे यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, तात्काळ टिकणारा आरक्षण दिलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांनी जे आश्वासन दिले ते पूर्ण करतीलच, परंतु जर का ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.

शिवसेना (शिंदे गटाचे) कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे

मुख्यमंत्र्यांना डोक्यावर घेऊन नाचू

दरम्यान, ‘साखळी उपोषणाला परवानगी नाकारत पोलिसांनी मराठा समाजाच्या प्रतिनिधींना नोटीस बजावली आहे. तहसिलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन दयावे उपोषण करू नये, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपल्यावर कारवाई केली जाईल असे नोटीशीत नमूद केले आहे. यावर आमचे उपोषण शांततेत चालू असताना ही दडपशाही कशासाठी?’ असा सवाल मोरे यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Maratha Reservation : ”मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर…”, भाजप आमदाराचा सरकारला मोठा इशारा

‘मराठा मुख्यमंत्री असताना मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांना नोटीस बजावल्या जात असतील तर मराठा मुख्यमंत्री आम्हाला नको.’ असे मोरे यावेळी म्हणाले. ‘मुख्यमंत्र्यांनी जर आरक्षण दिले तर आम्ही त्यांना पुढील 25 वर्षे मुख्यमंत्री करू आणि डोक्यावर घेऊन नाचू.’ असेही मोरे म्हणाले.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT