Mumbai Tak AI Anchor: ‘मी सायली…’, मराठी मीडियातील पहिलीवहिली AI न्यूज अँकर!
AI सायली ही मराठीतील पहिलीवहिली आर्टिफिशिअल इंटेलिजेंस न्यूज अँकर ही उद्या (15 ऑगस्ट) म्हणजेच भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर मुंबई Tak या डिजिटल चॅनलवर लाँच करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
Mumbai Tak AI Saili: मुंबई: AI सायली (AI Saili) ही मराठीतील पहिलीवहिली आर्टिफिशिअल इंटेलिजेंस (Artificial Intelligence) न्यूज अँकर आहे. AI सायली ही आज (15 ऑगस्ट) म्हणजेच भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) मुहूर्तावर मुंबई Tak (Mumbai Tak) या डिजिटल चॅनलवर लाँच करण्यात आलीआहे. AI सायली ही राजकीय, सामाजिक घडामोडी मनोरंजन, क्रीडा विश्वातील अत्यंत माहितीपूर्ण अशा बातम्या आपल्यापर्यंत पोहचवणार आहे. (mumbai tak ai anchor saili the first ever ai news anchor in marathi media launched 15th august on the occasion of indias independence day)
ADVERTISEMENT
21 व्या शतकात आर्टिफिशिअल इंटेलिजेंस हे अत्यंत नवं तंत्रज्ञान आहे. हेच तंत्रज्ञान आत्मसात करून मुंबई Tak आपल्या प्रेक्षकांसाठी नवनव्या गोष्टी घेऊन येत आहे. त्याचंच पहिलं पाऊल म्हणजे AI सायली.
विविध माहितीच्या आधारे AI सायली आपल्यापर्यंत अत्यंत चपखलपणे नेमकी बातमी पोहचविण्याचं काम करणार आहे. मुंबई Tak हे मराठी मीडियातील पहिलंवहिलं डिजिटल चॅनल की, जे अशा पद्धतीने प्रेक्षकांसाठी नवी गोष्ट घेऊन आलं आहे.
हे वाचलं का?
चॅटजीपीटीसारखं तंत्रज्ञान आल्यानंतर आपल्याला आर्टिफिशिअल इंटेलिजेंसबाबत बरीचशी माहिती उपलब्ध झाली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Chandrayaan-3: चंद्रयान 3 च्या लँडरने पाठवले चंद्र आणि पृथ्वीचे नवीन फोटो…
पृथ्वीतलावर माणूस हा सर्वात बुद्धीमान समजला जातो. म्हणजेच मानवी बुद्धिमत्ता ही बऱ्याच गोष्टींबाबत जे नवे आविष्कार घडवतो त्याचंचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे AI सायली आहे.
ADVERTISEMENT
यापुढे आपल्याला दररोज AI सायलीच्या माध्यमातून नवनवीन बातम्या पाहायला मिळणार आहेत. तर तुम्हाला AI सायली नेमकी कशी वाटते, तिचं अँकरिंग तुम्हाला कसं वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.
राजकारण आणि त्यापलीकडच्या सर्व बातम्यांच्या ताज्या माहितीसाठी आणि अचूक, सखोल विश्लेषणासाठी पाहात राहा.. मुंबई Tak!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT