हद्दच झाली! Vlog बनवणाऱ्या तरूणीसोबत 10 वर्षांच्या मुलाचं किळसवाणं कृत्य! Viral Video

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Viral Video News Story : बंगळुरूमधील एका घटनेचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नेहा बिस्वालसोबत बंगळुरू येथील बीटीएम लेआउटच्या रस्त्यावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नेहा कामावरून घरी परतत असताना चालता-चालता व्हिडीओ ब्लॉग रेकॉर्ड करत होती यावेळी अचानक एक मुलगा सायकलवरून तिच्या जवळ आला आणि त्याने तिच्या छातीला हात लावत गैरवर्तन केलं. हा संपूर्ण प्रकार नेहाच्या व्लॉगमध्ये कैद झाला आहे. (bengaluru video viral woman was making a vlog while walking on the road then a 10 year old boy came and did a dirty act)

ADVERTISEMENT

नेमकं काय आहे प्रकरण?

हा व्हिडिओ 6 नोव्हेंबर रोजी @karnatakaportf नावाच्या X (ट्विटर) अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, इंस्टाग्राम यूजर @nehabiswal120 हा व्लॉग बनवत असताना तिच्यासोबत ही लज्जास्पद घटना घडली. या घटनेनंतर नेहाने एक वेगळा व्हिडीओ तयार करून तिच्यासोबत नेमकं काय घडलं? ते सांगितलं. ती म्हणाली, 'या घटनेने मी खूप घाबरली आहे. याआधी मला कधीही अशी भीती वाटली नव्हती. मी रस्त्यावरून चालत असताना एक व्लॉग रेकॉर्ड करत होती, तेव्हा एक मुलगा, जो सायकल चालवत होता, त्याने अचानक यू-टर्न घेतला आणि माझ्याजवळ आला. 

सुरूवातीला त्याने चिडवलं पण नंतर माझ्यासोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली." नेहाचे बोलणे इथेच संपत नाही, तिने सांगितले की त्या मुलाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण जवळच्या लोकांनी त्याला पकडले. पोलिसांना बोलावले आणि त्यानंतर हा मुलगा केवळ 10 वर्षांचा असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले. आजूबाजूच्या लोकांनी नेहाला माफ करण्याची विनंती केली कारण तो लहान मुलगा आहे.

हे वाचलं का?

मात्र, जेव्हा नेहाने या घटनेचा व्हिडिीओ दाखवला तेव्हा त्या मुलाने काय केले हे लोकांना समले. मुलगा लहान आहे, त्याला सोड, असे अनेकजण नेहाला सांगत होते, पण नेहाला ते मान्य नव्हते. घटनेनंतर तिने त्या मुलाला मारलं असंही सांगितलं. काही लोकांनी नेहाला पाठिंबा दिला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT