Video : पिटबुल तोडत होता लचके अन् कुटुंब पाहत राहिलं, भयंकर घटना कॅमेऱ्यात कैद
दिल्लीतील या घटनेत एका पिटबूल कुत्र्याने महिलेवर हल्ला करून तिला जखमी केल्याची घटना घडली आहे. महिलेने पिटबुल कुत्र्याच्या सांभाळ करणाऱ्या कुटुंबाला तिच्या घराजवळ शौच करण्यास विरोध दर्शवला होता
ADVERTISEMENT
Pitbull Dog Attack women viral Video : दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत एका पिटबुल कुत्र्याने महिलेवर हल्ला करून तिला जखमी केल्याची घटना घडली आहे. महिलेने पिटबुल कुत्र्याच्या सांभाळ करणाऱ्या कुटुंबाला तिच्या घराजवळ शौच करण्यास विरोध दर्शवला होता. या विरोधातून दोन्ही कुटुंबियांमध्ये भांडण झाले. या भांडणातूनच ही घटना घडली होती. ही संपूर्ण घटना परिसरात लावलेल्या कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ इतका भयानक आहे की अंगारे शहारे येतील. या घटनेत जखमी महिलेवर सध्या उरचार सुरु आहेत. तर पिडीत महिलेने कुटुंबियांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. (pitbull dog attack in women video viral delhi swarup nagar incident)
ADVERTISEMENT
दिल्लीतील स्वरूप नगर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 च्या सुमारास घडली आहे. स्वरूप नगर परिसरातील 14 क्रमांकाची गल्ली आहे. या परिसरात राहणाऱ्या रिया देवी यांच्या घरासमोर शेजारील महिला तिच्या पिटबूल कुत्र्याला शौच करण्यासाठी घेऊन येते. या घटनेवरून संतापलेली रिया देवी तिच्या कुटुंबियाकडे तक्रार करायला जाते. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
हे ही वाचा : Ajit Pawar : ”माझ्या डोळ्यादेखत अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं”
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, रिया तिच्या शेजारच्या कुटुबियांच्या घरासमोर उभी आहे. या दरम्यान दोन्ही महिलांमध्ये भांडण सूरू होते. या कुटुंबियांचा
पिटबूल डॉग रस्त्यावर फिरत आहे. या दरम्यान दोन महिलांना भांडताना पाहून एक मुलगा तिकडे येऊन उभा राहतो. या दरम्यान पिटबुल मुलाला स्पर्श करतो आणि त्याचा पाय चावण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर मुलगा घाबरून मागे पळतो.
हे वाचलं का?
What would you do to protect yourself in this situation?#DelhiNCR #Dog #pitbullattack pic.twitter.com/ZjZQUZpip8
— Amit Sahu🇮🇳 (@amitsahujourno) November 5, 2023
घराच्या दारातून भांडणारी महिला पुढे जाऊन रियाच्या समोर उभी राहून भांडायला सुरूवात करते. महिला रियाच्या जवळ येताच पिटबुल कुत्रा देखील तिकडे येतो.यानंतर मग अचानक रियावर हल्ला करायला सुरुवात करतो. त्यानंतर घरातील एक मुलगा बाहेर येऊन पिटबूलला घरात नेण्याचा प्रयत्न करतो. मात्र पिटबूल काही नियंत्रणात येत नाही आणि रियावर पुन्हा हल्ला करतच राहतो.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना ह्रदयविकाराचा झटका, मुंबईला हलवणार
ही संपूर्ण घटना पाहून रियाचे इतर कुटुंबिय घटनास्थळी जमते आणि कुटुंबियांशी वाद घालू लागते. त्याचवेळी महिलेच्या घरातील इतर कुटुंबिय देखील कुत्र्याला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करते. मात्र कुत्रा काही नियंत्रणात येत नाही आणि शेवटपर्यंत रियावर हल्ला करत राहतो. यावेळी रियाही बचावासाठी कुत्र्यावर दगडफेक करते. यानंतर कुत्र्याने मुलीच्या हातातून स्वतःची सुटका करून घेत पुन्हा रियावर हल्ला करतो. घरातील चार जण मिळून पिटबुलला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. पण तो काही नियंत्रणात येत नाही. आणि शेवटपर्यंत रियावर हल्ला करत राहतो. व्हिडिओमध्ये रियाने तिचा जखमी हात पकडलेला दिसत आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान या घटनेत पिटबूलच्या हल्ल्यात रियाच्या शरीरावर पाच ठिकाणी जखमा झाल्या आहेत. तिला तातडीने रूग्णालयात उपचाराखातर दाखल करण्यात आले आहे. पीडित महिलेने शेजारच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेजारच्या महिलेने मुद्दाम तिच्या कुत्र्याला सोडल्याचा आरोप रियाने केला आहे. त्याचबरोबर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT