Pune Crime : शाळेत निघालेल्या चिमुकलीला खाऊचं आमिष दाखवून गिरणीत नेलं, 27 वर्षीय नराधमाकडून अत्याचार

मुंबई तक

Pune Crime News: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी वाघोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत तिच्या कुटुंबासह राहते. ती सकाळी 7 वाजताच्या सुमारास शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली होती. त्यानंतर ही घटना घडली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील वाघोली परिसरात पुन्हा एक संतापजनक घटना

point

आरोपीकडून चिमुकलीवर गिरणीमध्ये घेऊन जात अत्याचार

Pune Wagholi : पुण्यातील पुन्हा एक संतापजनक घटना समोर आली आहे. वाघोलीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर शाळेत जात असताना लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर 27 वर्षीय नराधमाने अत्याचार केला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सोमवारी सकाळी रहिवाशांना एक मुलगी रस्त्यावर रडताना दिसली होती. त्यावेळी स्थानिक लोकांनी तिला पाहिलं. त्यानंतर लोकांनी तिच्या जवळ जात विचारणा केली असता, ही घटना उघडकीस आली. घटना ऐकून हादरलेल्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनेतं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं तिथे पोहोचले.

हे ही वाचा >> Sambhajiraje : संभाजीराजेंनी दाखवले 3 जुने फोटो, वाघ्या कुत्र्याचा पुरावा नाही, हाकेंच्या 'त्या' आरोपालाही उत्तर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी वाघोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत तिच्या कुटुंबासह राहते. ती सकाळी 7 वाजताच्या सुमारास शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली होती. मुलगी रोज याच रस्त्यावरुन शाळेत जात होती. त्याच रस्त्यावर असलेल्या एका पिठाच्या गिरणीवर आरोपी काम करतो. सोमवारी सकाळी आरोपीने मुलीला अडवलं, तिला खाऊ देण्याचं  आमिष दाखवलं गिरणीत नेलं. आरोपीने इथेच मुलीवर अत्याचार केल्याची माहिती आहे.

हे ही वाचा >> साताऱ्याच्या 'त्या' पोरांनी थायलंडमध्ये जाऊन केला बलात्कार, त्या रात्री काय घडलं?

या घटनेनंतर, मुलगी गिरणीतून बाहेर पडली आणि रस्त्यावर उभी राहिली. मुलगी अस्वस्थ होऊन रडत होती, तेव्हा स्थानिक नागरिकांनी विचारपूस केली. घटना कळल्यानंतर स्थानिकांनी  तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp