पुण्यात रस्त्यावर पेन विकणाऱ्या लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, अल्पवयीन आरोपींनी गाडीवर घेऊन जात...

मुंबई तक

Pune Crime: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलींचे कुटुंब रस्त्यावर सामान विकणारे विक्रेते आहेत. या मुली शिवाजीनगर परिसरात प्लास्टिकच्या पिशव्या, पेन आणि फुले यासारख्या छोट्या छोट्या वस्तू विकतात.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील घटना

point

रस्त्यावर पेन विकणाऱ्या मुलींवर लैंगिक अत्याचार

point

रस्त्यावर सामान विकून उदर्निवाह करतं कुटुंब

Pune Crime News : रोज घडणाऱ्या वेगवेगळ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत आहेत. मारामाऱ्या, खून, बलात्कार, चोरी, कोयता गँगची दहशत यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. तर अशातच पुन्हा एक संतापजनक घटना समोर आली आहे. रोज काम करुन पोट भरणाऱ्या आणि रस्त्यावर उदर्निवाह करणाऱ्या कुटुंबातील दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. 

हे ही वाचा >> सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत Ghibli इमेज, फडणवीसांनी केली पोस्ट, नेमकं काय आहे Ghibli?

पुण्यात छोट्या छोट्या वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या रस्त्यावरील विक्रेत्यांच्या कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला. ही घटना 17 मार्च रोजी शिवाजीनगर परिसरात घडली. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी पीडित मुलींच्या आईने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलींचे कुटुंब रस्त्यावर सामान विकणारे विक्रेते आहेत. या मुली शिवाजीनगर परिसरात प्लास्टिकच्या पिशव्या, पेन आणि फुले यासारख्या छोट्या छोट्या वस्तू विकतात. पीडित दोन्ही मुली बहिणी आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंब रस्त्यावर छोट्या छोट्या वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करतं. पीडित मुलींच्या बहिणीचं ज्या मुलासोबत झालंय, त्यांच्या नात्यातला आरोपी असल्याची माहिती आहे. त्यामुळे तो आरोपी पीडित मुलींना ओळखत होता.

हे ही वाचा >> 'वादग्रस्त' कवितेच्या प्रकरणात इम्रान प्रतापगढींना दिलासा, काय होतं प्रकरण? कुणाल कामरालाही...

17 मार्च रोजी अल्पवयीन मुलं शिवाजीनगर परिसरात आली. त्यांनी मुलींशी संपर्क साधला. त्यांनी दोन्ही मुलींना त्यांच्या बहिणीला भेटण्याचं आमिष दाखवून दुचाकीवरून नेलं. त्यावेळी मुलांची आई तिथे होती. त्यानंतर मुलांनी दोन्ही अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला. त्यानंतर मुलींनी त्यांना त्यांच्या पालकांकडे सोडण्यास सांगितले. आरोपी मुलांनी त्यांना शिवाजीनगर परिसरात आणून सोडलं. घाबरलेल्या मुलींनी त्यांच्या आईला घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या आईने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp