Walmik Karad Surrender : "...तर न्यायालय देईल ती शिक्षा मला मान्य", वाल्मिक कराड पुणे पोलिसांना शरण

मुंबई तक

याप्रकरणातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट असून, यापुढे होणाऱ्या सर्व कारवाईवर आता राज्याचं लक्ष असणार आहे. वाल्मिक कराड याने एक व्हिडीओ शेअर करत यावरुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वाल्मिक कराड पोलिसांना शरण

point

पुण्यातील CID कार्यालयात शरण

point

व्हिडीओ शेअर करत म्हणाला....

Walmik Karad Surrender in Pune CID : वाल्मिक कराड यांच्यावर सध्या राज्याचं लक्ष लागून असतानाच आता वाल्मिक कराड आता शरण आला आहे. याप्रकरणातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट असून, यापुढे होणाऱ्या सर्व कारवाईवर आता राज्याचं लक्ष असणार आहे. वाल्मिक कराड यांनी एक व्हिडीओ शेअर करत यावरुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर पुण्यातील पाषाण येथील CID कार्यालयात तो शरण आला आहे.

हे ही वाचा >> Jitendra Awhad : "वाल्मिक कराड शानमध्ये, कडक कपडे घालून पुण्यातील...", जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टमुळे खळबळ

संबंधीत व्हिडीओमध्ये वाल्मिक कराड म्हणाला, "मी वाल्मिक कराड, केज पोलीस स्टेशनमध्ये माझ्याविरोधात खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असतानाही मी CID पुणे कार्यालयात शरण जाणार आहे. संतोषभैय्या देशमुखांचे जे मारेकरी असतील, त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जातं आहे. मी जर पोलीस चौकशीत दोषी दिसलो तर त्यामध्ये मला न्यायायल देईल ती शिक्षा मान्य असेल" असं वाल्मिक कराड म्हणाला. 

पुण्यातील CID कार्यालयाबाहेर आज सकाळपासूनच पोलिसांचं बंदोबस्त वाढला होता. तसंच वाल्मिक कराडचे काही समर्थकही तिथे आल्याची माहिती समोर आली आहे. हा सगळा गोंधळ पाहून काहीतरी घडणार असा अंदाज आधीच आला होता. त्यातच वाल्मिक कराडने एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यानंतर अगदी काही मिनिटातच वाल्मिक कराड शरण आला. 

आव्हाडांची काहीवेळापूर्वीच पोस्ट


"आजच्या दिवसभरात वाल्मिक कराड हा पोलिसांकडे स्वाधीन होईल, असे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजले आहे. ही माहिती मी का देतोय कारण तो स्वतः पोलिसांना स्वाधीन झाल्यानंतर , एक पत्रकार परिषद घेण्यात येईल. या पत्रकार परिषदेत, त्याला पुण्याजवळील एका घाटात गाडीतून गोवा किंवा असे कुठे तरी लांब जात असल्याची माहिती पोलिसांना खबरींकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या गाडीसमोर आडवी गाडी टाकून त्याला अडविला आणि त्याच्या काॅलरला धरून त्याला खेचत आणून गाडीत बसवला, अशा सगळ्या कहाण्या प्रसृत करण्यात येतील. पण, महाराष्ट्राने अशा कुठल्याही कहाण्यांवर विश्वास ठेवू नये. कारण त्याला पकडायचा असता तर त्याला कधीच पकडला असता." असं आव्हाड म्हणाले.



 

हे वाचलं का?

    follow whatsapp