Manoj Jarange : शिंदे सरकारचा जरांगे पाटलांना नवा प्रस्ताव काय? बैठकीत काय ठरलं?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Maratha Reservation maharashtra government appeal to manoj jarange patil.
Maratha Reservation maharashtra government appeal to manoj jarange patil.
social share
google news

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलं आहे. राज्यभरात आंदोलनाचे लोण पसरले आहे. दरम्यान, विविध ठिकाणी पडसाद उमटत असतानाच सोमवारी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत काही मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर मनोज जरांगे यांनी किंवा त्यांच्या शिष्टमंडळाने चर्चेस येण्याचा नवा प्रस्ताव देण्यात आला. (Maharashtra Cabinet sub committee meeting on maratha reservation)

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाले निर्णय?

1) न्या. संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल उद्याच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला जाईल.

2) निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले, एम जी गायकवाड आणि संदीप शिंदे यांची सल्लागार समिती नेमण्याचा निर्णय झाला असून, ही समिती मराठा आरक्षण न्यायालयात टिकण्यासंदर्भात तसेच सरकारला मागासवर्ग आयोग आणि शासनाला मार्गदर्शन करेल.

हे ही वाचा >> Manoj Jarange: ‘या सरकारला एकाचा बळी घ्यायचाय तर…’, जरांगे-पाटलांना अश्रू अनावर!

3) सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिका दाखल करून घेण्यास संमती दिल्यामुळे राज्य शासनासमोर चांगली संधी आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन लढाईसाठी आपण स्थापन केलेल्या वरिष्ठ वकिलांच्या टास्क फोर्सची बैठक तातडीने घेण्यात येऊन त्यामध्ये पुढील न्यायालयीन लढाई लढण्याविषयी निश्चित दिशा ठरविण्यात येईल.

इम्पेरिकल डेटा तयार करणार

4) सर्वोच्च न्यायालयातील क्युरेटिव्ह याचिकेवर न्यायालयीन कार्यवाही सुरु राहील. मात्र तो पर्यंत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय फेटाळताना जी निरीक्षणे नोंदविली तिचा अभ्यास मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे हे करतील. त्याचप्रमाणे समाजाच्या मागासलेपणाचे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, गोखले इन्स्टिट्यूट यासारख्या इतर नामांकित संस्थांकरवी नव्याने सर्व्हेक्षण करून इम्पेरिकल डेटा तयार करण्यात येईल.

हे ही वाचा >> Maratha Reservation : बीडमध्ये अजित पवार गटाच्या आमदाराचा बंगला आंदोलकांनी पेटवला

5) मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यात मागील प्रक्रियेतील झालेल्या ज्या त्रृटी नोंदविल्या गेल्या आहेत, त्याचे निराकरण करण्यात येईल.

6) मराठवाड्यातल्या जुन्या नोंदी तपासताना उर्दू आणि मोडी भाषेतील कागदपत्रांचे स्कॅन तसेच भाषांतर करून घेण्यात येतील.
सर्व जिल्हाधिकारी प्रांताधिकारी व तहसिलदारांना उद्याच व्हिसीद्धारे सूचना देण्यात येऊन कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आवश्यक ती कागदपत्रांची पडताळणी वेगाने करण्याच्या सूचना देण्यात येतील.

ADVERTISEMENT

जरांगेंनी चर्चेला यावे

7) मनोज जरांगे पाटील यांनी चर्चेसाठी पुढे यावे, तसेच आंदोलनावेळी शांततेचा मार्ग सोडू नये. या संदर्भामध्ये चर्चेसाठी जरांगे यांचे जे प्रतिनिधी येणार असतील त्यांच्याशी समन्वय साधून बैठकीचे आयोजन उद्याच राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्याचे निर्देश जालना जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT