28 February 2025 Gold Rate : मज्जाच मज्जा! फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे भाव घसरले, मुंबईत आजचे दर काय?
Gold Rate Today : फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ग्राहकांसाठी फायदेशीर ठरला आहे. सोन्या-चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घट झाल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली घट?

सोन्याच्या 22 आणि 24 कॅरेटचे आजचे दर काय?

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Gold Rate Today : फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ग्राहकांसाठी फायदेशीर ठरला आहे. सोन्या-चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घट झाल्याचं समोर आलं आहे. सोन्याच्या 24 कॅरेटचे दर आज 28 फेब्रुवारीला जवळपास 500 रुपयांनी घसरले आहेत. तर 22 कॅरेट सोनं 400 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर चांदीच्या भावात थोडी तेजी असल्याचं समोर आलं आहे.
भारतीय सराफा बाजारात एक किलोग्रॅम चांदीचे दर 98 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. तर 27 फेब्रुवारीला चांदीचे प्रति किलोचे दर 95725 रुपयांवर पोहोचले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय मार्केट्समध्ये सोन्याच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर जवळपास 87300 रुपयांपर्यंत आहेत.
देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 80100 रुपयांच्या जवळपास आहे. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. इथे सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 87520 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 80240 रुपये झाले आहेत. तर मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव 80090 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचे दर 87370 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> Pune Rape Case: अटक होण्यापूर्वी आरोपीने आत्महत्येचा का केला प्रयत्न? पोलिसांनी सांगितली खळबळजनक माहिती
देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर
दिल्ली
दिल्लीत सोन्याच्या 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87520 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 80090 रुपये झाले आहेत.
मुंबई
मुंबईत सोन्याच्या 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87370 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 80090 रुपये झाले आहेत.
कोलकाता
कोलकातामध्ये सोन्याच्या 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87370 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 80090 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> Pune: पाणी प्यायला गेला अन् पोलिसांना सापडला, नराधम दत्तात्रय गाडेच्या अटकेची Inside Story
चेन्नई
चेन्नईत सोन्याच्या 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87370 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 80090 रुपये झाले आहेत.
चांदीचे आजचे भाव
चांदीच्या किंमती प्रति किलोग्रॅम 97900 रुपयांवर पोहोचल्या आहेत. जर यामध्ये जीएसटीला जोडलं तर, याची किंमत प्रति किलोग्रॅम 99910 रुपयांपर्यंत पोहचेल. तर चांदीच्या जुन्या अलंकारांचा रेट जीएसटीशिवाय 90000 रुपये प्रति किलो आहे.