'हा' VIDEO तुम्हाला विचलित करू शकतो, मुलगी मम्मी-मम्मी ओरडत राहिली अन् Reel च्या नादात महिला थेट...

मुंबई तक

उत्तरकाशीच्या मणिकर्णिका घाटावर सर्वांनाच चकित करणाऱ्या एका भीषण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक महिला फोटो किंवा व्हिडीओ काढताना गंगा नदीत वाहून गेली.

ADVERTISEMENT

उत्तरकाशीच्या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहा, नेमकं काय घडलं?
उत्तरकाशीच्या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहा, नेमकं काय घडलं?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उत्तरकाशीमधील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

point

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहा, नेमकं काय घडलं?

point

रील बनवण्यासाठी महिला नदीत उतरल्यानंतर काय घडलं?

Viral Video: उत्तरकाशीच्या मणिकर्णिका घाटावर सर्वांना हादरवून टाकणाऱ्या एका भीषण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 14 एप्रिल रोजी ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला फोटो किंवा व्हिडीओ काढण्याच्या नादात थेट गंगा नदीत वाहून गेली. ती महिला कॅमेऱ्याकडे पाहत-पाहत नदीकडे जात होती. पण त्याचवेळी तिचा अचानक तिचा पाय घसरला आणि ती गंगेच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली. असे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे .

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नदीचा प्रवाह जोरदार असल्यामुळे महिला स्वत:ला सांभाळू शकली नाही आणि गंगेच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली. दरम्यान, जेव्हा महिला वाहून जात होती तेव्हा तिची मुलगी 'मम्मी-मम्मी...' असा टाहो फोडत असल्याचं व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. मात्र, अद्याप ही महिला सापडलेली नाही.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच, लोक सेल्फी आणि रीलच्या नादात आपला जीव धोक्यात घालत असल्याचेसुद्धा त्यांनी सांगितले.

हे ही वाचा: 'सासूच नाही तर आणखी दोन महिलांनाही...', तरुण सासूला पळवून नेणाऱ्या जावयाबाबत सासऱ्यांनी सांगितली 'ती' गोष्ट!

लोक काय म्हणाले?

बऱ्याचदा, रील बनवण्याच्या नादात लोक स्वतःचा जीवही धोक्यात घालतात. फोटोज किंवा रील काढण्यासाठी अनेकदा लोक त्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतात. याचप्रकारे, नदीकाठावर उभे राहिल्यानंतर नदीचा प्रवाह लक्षात ठेवला पाहिजे. अशा अनेक अपघातांचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो.

Reel चे वेड

Reel च्या वेडामुळे अनेकदा लोकांच्या जीवावर बेततं. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात याचंच उदाहरण पाहायला मिळालं. यावेळी एक तरुण रेल्वे ट्रॅकवर झोपून रील बनवत होता आणि त्याचवेळी पूर्ण ट्रेन त्याच्या अंगावरुन गेली. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी त्याच्या शरीरावर एकही ओरखडा आला नाही. 

हे ही वाचा: नाशिकमध्ये मध्यरात्री घडलं तरी काय? दगडफेक, तोडफोड अन्... 'त्या' दर्ग्यावरून तुफान राडा

कुसुंभी रेल्वे स्थानकाजवळ ही धक्कादायक घटना घडली. यावेळी रणजित चौरसिया नावाच्या तरुणाने ट्रॅकवर पडून व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर त्याने अपलोड केला. व्हिडिओमध्ये तो शाहरुख खानच्या 'बादशाहो' चित्रपटातील एका गाण्यावर तो अभिनय करत होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp