Maharashtra Weather : मुंबई शहर आणि उपनगरात होणार विजांचा गडगडाट! राज्यात 'या' ठिकाणी कोसळणार पावसाच्या सरी

मुंबई तक

Maharashtra Weather Today : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात वेगवेगळे बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने काल बुधवारी 3 एप्रिलला राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather Today
Maharashtra Weather Today (फोटो सौजन्य - AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कसं आहे राज्यातील आजचं हवामान ?

point

मुंबईसह या ठिकाणी कोसळणार पावसाच्या सरी

point

आजच्या हवामानाबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Maharashtra Weather Today : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात वेगवेगळे बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने काल बुधवारी 3 एप्रिलला राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. इतकच नव्हे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटी होण्याची शक्यताही वर्तवली होती. तसच राज्यातील काही भागात ऑरेंज आणि यलो अलर्टही जारी केला होता. अशातच आज 4 एप्रिलसाठी हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. राज्यातील आजच्या हवामानाबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

राज्यात कसं असेल आजचं हवामान? 

भारतीय हवामान विभागाने (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज. शहर आणि उपनगरात दुपार/संध्याकाळी ढगाळ आकाशासह पाऊस किंवा गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५°C आणि २४°C च्या आसपास असेल.

हे ही वाचा >> अनंत अंबानींनी रस्त्यावरच खरेदी केला कोंबड्यांचा ट्रक, पण सोशल मीडियावर मात्र...

कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी 40-50 किमी वेगाने विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. 3 एप्रिल रोजी राज्यातील कमाल तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, तर किमान तापमान 20 ते 23 अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. सोसाट्याच्या वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत असण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती. 

हे ही वाचा >> Viral News: लिंग बदलून आधी सरिताचा झाला शरद.. आता स्वत: बनला बाप, बायकोने दिला बाळाला जन्म

हे वाचलं का?

    follow whatsapp