छत्रपती संभाजीनगर हिंसाचार : ओहरमध्ये दोन गटात तुफान दगडफेक, 7 लोक जखमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

chhatrapati sambhajinagar violence : 7 injured in stone pelting incident in ohar village district of chhatrapati sambhaji nagar
chhatrapati sambhajinagar violence : 7 injured in stone pelting incident in ohar village district of chhatrapati sambhaji nagar
social share
google news

छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात हिंसाचाराची घटना घडली. या घटनेला काही तास लोटत नाही, तोच शहराजवळ असलेल्या ओहर गावात दोन गटात वाद होऊन तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण असून, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

ADVERTISEMENT

हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar : हिंसाचार करणारे सीसीटीव्हीत कैद, 6 CCTV फुटेज समोर

किराडपुरा भागात घडलेल्या घटनेचीच पुनरावृत्ती छत्रपती संभाजीनगर शहराच्या जवळ असलेल्या ओहर गावात घडली आहे. ओहर गावात दोन गटात जुन्या कारणावरून सकाळी अचानक वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर दोन गटानी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.

रस्त्यावर विटा आणि दगडांचा खच

दोन्ही बाजूंचा जमाव चांगलाच आक्रमक झाला होता. संतप्त लोकांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. त्यामुळे ओहर गावातील रस्त्यांवर ठिकठिकाणी विटा आणि दगडांचा खच पडला होता. घटनेचे काही व्हिडीओही व्हायरल झाले असून, त्यात लोकांमध्ये भांडण सुरू असल्याचे तसेच दगडफेक करतानाचा प्रकार दिसत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ओहरमध्ये दोन गटात वाद का झाला, पोलिसांनी काय सांगितले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओहर गावात दोन गटात जुन्या वादातून दगडफेक झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस गावात दाखल झाले. सध्या गावातील परिस्थिती नियंत्रणात असली, तरी तणावपूर्ण आहे. सध्या दोन्ही गटाच्या तक्रारींवरून एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

हेही वाचा – मालवणीत संभाजीनगरची पुनरावृत्ती टळली! शोभायात्रेदरम्यान काय घडलं?

ओहर गावात झालेल्या घटनेचा इतर कुठल्या घटनेशी संबंध जोडला जाऊ नये वा कुठलीही अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओहर गावात झालेल्या दगडफेकीत पाच ते सात लोक जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. या घटनेत आतापर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ADVERTISEMENT

7 injured in stone pelting incident in ohar village district of chhatrapati sambhaji nagar
ओहर गावात दोन गटात जुन्या वादातून दगडफेक झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस गावात दाखल झाले.

अजित पवारांनी केले शांतता राखण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात झालेल्या हिंसाचारानंतर आता ओहर गावातही दगडफेक झाली आहे. दरम्यान, संभाजीनगर झालेल्या हिंसक घटनेवर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. “मी काल आव्हान केलं आहे की, दंगल कोणी घडवून आणण्याच्या प्रयत्न करत असेल तर असं होऊ नये. मी जरी विरोधी पक्षात असलो, तरी कुठल्याही प्रकारचे वक्तव्य करणार करणार नाही, ज्यामुळे वातावरण बिघडेल. सगळ्यांनी शांतता प्रस्थापित करायला हवी. मी तमाम बांधवांना आवाहन करेल की कृपया माथी भडकून देण्याचे काम केलं तर त्याला कोणी ही बळी पडू नका”, असं अजित पवार म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT