Baba Siddique Death : खळबळजनक! अजित पवारांचे नेते बाबा सिद्दीकींची हत्या, गोळीबारात झाला मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

 ajit pawar leader baba siddiqui fired in bandra admitted in lilavati hospital mumbai crime
बाबा सिद्दीकींवर वांद्रयात गोळीबार
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बाबा सिद्दीकींवर वांद्र्यात गोळीबार

point

तीन हल्लेखोरांनी केला गोळीबार

point

लीलावती रूग्णालयात उपचार सूरू

Baba Siddique Dead In Firing : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर वांद्र्यात गोळीबाराची घटना घडली होती. या गोळीबारात त्यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकींवर (Baba Siddique Dead)  गोळीबार केला होता. या गोळीबारात बाबा सिद्दीकी गंभीररित्या जखमी झाले होते. या घटनेनंतर सिद्दीकींना तत्काळ लिलावती रूग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (ajit pawar leader baba siddiqui fired in bandra admitted in lilavati hospital mumbai crime) 

ADVERTISEMENT

टीव्ही 9 ने दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी आपल्या कार्यालयातून बाहेर पडले होते. त्यानंतर गाडीत बसत असतानाच दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. या हल्लेखोरांनी सिद्दीकींच्या छातीवर दोन ते तीन राऊंड फायर केल्याची प्राथमिक माहिती आहे. यातली एक गोळी बाबा सिद्दीकींच्या छातीला लागल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर त्यांना तत्काळ त्यांना लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सूरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा : CM Eknath Shinde : "मला हलक्यात घेऊ नका...", दसरा मेळाव्यात शिंदेंनी कुणाला दिला इशारा?

बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या या गोळीबार आता सुनील तटकरे यानी प्रतिक्रिया दिली आहे. 'मी आताच माझे सगळे कार्यक्रम आटोपून माझ्या रायगडमधील निवासस्थानी आलो आहे. आपल्या आताच बातमी कळली. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांशी संपर्क साधतोय. परंतु आम्हा सर्वांसाठी ही अतिशय धक्कादायक बातमी आहे. गेली अनेक वर्ष बाबा सिद्दीकी हे मुंबईत काम करत आहेत. यामुळे मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करावा. तसेच बाबा सिद्दीकी यांच्यावर तातडीने उपचार त्यांच्यावर केले जावेत असंही मी रुग्णालयांना सांगेन'',असे सुनील तटकरे यांनी सांगितले आहे. तसेच मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना घटनास्थळी पोहचण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी अजितदादा, मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना विनंती करेन की त्यांनी पोलीस दलाला या घटनेबाबत तात्काळ सूचना द्याव्या.

हे वाचलं का?

काल संध्याकाळी आम्ही एक पक्षप्रवेश केला तेव्हा बाबा सिद्दीकी हे आमचे वरिष्ठ नेते म्हणून उपस्थित होते. त्यावेळी चर्चा झाली होती. प्रत्येक जण आपल्या मतदारसंघात काम करतो आहे.बाबा सिद्दीकी यांनी मुंबईत जी दीर्घकाळ राजकीय सेवा दिली आहे ते अजातशत्रू होते. पण आता पोलीस तपासातच या गोष्टी बाहेर येतील. मी आता ताबडतोब प्रशासनाशी बोलतो, असे देखील सुनील तटकरे यांनी सांगितले आहे. 

हे ही वाचा : Uddhav Thackeray : 'गुलाबी जॅकेट'वरून पवारांना पहिल्यांदाच ठाकरेंनी छेडलं, ''भाजपच्या झाडावरची...''

कोण आहेत बाबा सिद्दीकी? 

बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. काही महिन्यांपूर्वीच बाबा सिद्दिकींनी नुकतंच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. 12 फेब्रुवारी 2024 रोजी बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

ADVERTISEMENT

बाबा सिद्दीकी हे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून गेले होते 1999, 2004 आणि 2009 साली ते विधानसभेवर गेले होते. दरम्यान, त्यांनी राज्यमंत्री पदाची धुरा देखील सांभाळली होती.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT