Mumbai Local: पश्चिम, मध्य आणि हार्बर लाईनवर लोकल सेवा सुरु आहे का? अपडेट काय?
Mumbai Local Update: आज (9 जुलै) पावसाचा जोर कमी झाल्यामुळे ट्रॅकवरील पाणी दूर झाले असून तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा सुरू असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पावसाचा जोर कमी झाल्यामुळे लोकल सेवा सुरू असल्याची माहिती आहे.

मध्य रेल्वेच्या गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने

शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबई : Mumbai Train Update Live : मुंबईतील (Mumbai) पहिल्या मुसळधार पावसाने मुंबईकर हैराण झाले आहेत. कारण मुंबईची लाईफलाईन म्हटल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनची वाहतूक पावसामुळे सोमवारी (8 जुलै) विस्कळीत झाली होती. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली. मात्र सायंकाळी 7.30 नंतर वाहतूक हळूहळू सुरळीत होऊ लागली. सीएसएमटी ते ठाणे या दोन्ही मार्गांवर लोकल सेवा संथ गतीने सुरू होत्या. त्यामुळे आजचे मुंबईतील पावसाचे ताजे अपडेट्स जाणून घेऊयात.
आज (9 जुलै) पावसाचा जोर कमी झाल्यामुळे ट्रॅकवरील पाणी दूर झाले असून तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा सुरू असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा : Mumbai Rain Update: अतिमुसळधार पावसाचा इशारा, मुंबई, ठाण्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मध्य रेल्वेच्या CPRO ने दिलेल्या माहितीनुसार, "पाणी ओसरल्यानंतर हार्बर मार्गावरील ट्रॅक सकाळी 4.30 वाजता कार्यान्वित करण्यात आला आहे. मुख्य मार्गावरील जलद आणि धीम्या दोन्ही लोकल वेळापत्रकानुसार 2-3 मिनिटे उशिरा धावत आहेत आणि हार्बर मार्गावरील लोकल जवळपास वेळेवर धावत आहेत."
हेही वाचा : Raigad Fort: रायगडावर असं का घडलं?, ही दृश्य पाहून तुम्हीही हादरून जाल!
मध्य रेल्वेच्या गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने
यादरम्यान मुंबईसह उपनगरांमधील विस्कळीत झालेली लोकल आणि रेल्वे सेवा आज पुन्हा रुळावर आल्याचे चित्र आहे. पण असे असले तरी आज देखील मध्य रेल्वेच्या गाड्या गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. याबाबतच्या सूचना कल्याण रेल्वे स्थानकावरून देण्यात येत आहे. अशा परिस्थितीतही कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे.
लोकल सेवा सुरळीत झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण, आजही हवामान खात्याने मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे, त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
हेही वाचा : Mumbai Rain : मुंबईकरांनो, घराबाहेर पडू नका!, IMDचा इशारा काय?
शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठातील आज (9 जुलै 2024) होणाऱ्या सर्व परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नवीन तारखा लवकरच जाहीर होतील अशी माहिती मुंबई विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.