Shreya Ghoshal : X वर परतल्यानंतर श्रेया घोषालचं मोठं आवाहन! म्हणाली, "स्पॅम आणि धोकादायक पोस्टला..."
Shreya Ghoshal Back On X : प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालला तिचं एक्स अकाऊंट पुन्हा मिळालं आहे. मी पुन्हा एक्स अकाऊंटवर परतली आहे, असं श्रेयाने पोस्टमध्ये म्हटलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

गायक श्रेया घोषाल एक्सवर परतली

एक्सवर पुन्हा कमबॅक झाल्यानंतर श्रेया घोषालने केलं मोठं आवाहन

फेब्रुवारी महिन्यात श्रेयाचं अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं
Shreya Ghoshal Back On X : प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालला तिचं एक्स अकाऊंट पुन्हा मिळालं आहे. मी पुन्हा एक्स अकाऊंटवर परतली आहे, असं श्रेयाने पोस्टमध्ये म्हटलंय. श्रेयाचं एक्स अकाऊंट फेब्रुवारी महिन्यात हॅक करण्यात आलं होतं. जवळपास दोन महिन्यानंतर मायक्रोब्लॉगिंग साईटवर श्रेयाने सात मिलियन फॉलोअर्सला महत्त्वाचा संदेश दिला आहे.
श्रेया घोषालने एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, मी पुन्हा परतली आहे. मी या ठिकाणी नेहमी व्यक्त होत राहीन आणि लिहित राहीन. हा..माझा एक्स अकाऊंट अडचणीत आलं होतं. कारण फेब्रुवारीत ते हॅक करण्यात आलं होतं. अखेर मला एक्स टीमकडून मदत मिळाली आहे. त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला. सर्वकाही ठीक आहे. आता मी इथे आहे..
लोकांना सावध राहण्याचं केलं आवाहन
श्रेया घोषालने पोस्टमध्ये लोकांना जागरुक राहण्यासाठी आवाहन केलं आहे. श्रेयाच्या विरोधात चुकीच्या पद्धतीनं पोस्ट करण्यात आल्या होत्या. तसच एआय जनरेटेड पोस्टही प्रसारित झाले होते. यावर प्रतिक्रिया देताना श्रेया म्हणाली, हे क्लिक बेट्स आहेत. या पोस्ट स्पॅम आणि धोकादायक असतात. त्यांना तुम्ही वेळीच रिपोर्ट केलं पाहिजे. त्यांना बंद करण्याचा मला कोणताच अधिकार नाही. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले आहेत.
हे ही वाचा >> Dharashiv : शिंदे कॉलेजच्या फेअरवेलमध्ये 'त्या' विद्यार्थीनीचा अचानक झाला मृत्यू! भाषण सुरु असताना काय घडलं?
श्रेयाने दिली होती ही महत्त्वाची माहिती
गायक श्रेया घोषालने विचित्र पोस्ट विरोधाक कारवाई करण्यासाठी एक्स टीमकडे अपिल केली होती. गेल्या महिन्यात श्रेया घोषालने इन्स्टाग्राम पोस्टवर म्हटलं होतं की, माझा एक्स अकाऊंट 13 फेब्रुवारीला हॅक झाला होता. तेव्हापासून मी हे अकाऊंट सुरु करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, मला एक्स टीमपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. परंतु, मला काही यावर अपेक्षित असं उत्तर मिळालं नाही.