Video : मित्राशी बोलता बोलता अंगावर कोसळला AC,युवकाचा जागीच मृत्यू; हादरवून टाकणारा व्हिडिओ
Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात तर काही व्हिडिओ हे खूपच धक्कादायक असतात. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत एका तरूणाच्या (Boy) अंगावर एसी कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अंगावर एसी कोसळून तरूणाचा जागीच मृत्यू
दिल्लीच्या करोल बागात ही घटना घडली
व्हिडिओ पाहून काळजाचा थरकाप उडेल
Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात तर काही व्हिडिओ हे खूपच धक्कादायक असतात. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओत एका तरूणाच्या (Boy) अंगावर एसी कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ पाहुन तुमच्या काळजाचा थरकाप उडेल. (delhi youth died ac fall upon head from third floor on the spot date viral video karol bag shocking story)
ADVERTISEMENT
दिल्लीच्या करोल बागात ही घटना घडली आहे. या घटनेत एका सीसीटीव्हीच्या आव्हारात दोन मित्र एकमेकांशी गप्पा मारत होते. या दरम्यानच अचानक इमारतीवरून एक एसी कोसळतो. या एसीमुळे 19 वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू होतो. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होते.
हे ही वाचा : Eknath Shinde : ''...म्हणून फडणवीसांच्या अटकेचा डाव रचला होता'', शिंदेंचा खळबळ उडवणारा गौप्यस्फोट
दिल्लीच्या करोल बागमधील डोरीवालान परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीच्या आवारात दोन मुले गप्पा मारत होती. यामध्ये एक मुलगा हा गाडीवर बसला होता तर त्याच्या मित्र हा त्याच्यासोबत उभ्याने बोलत असतात. दोघांमध्ये अशीच चर्चा सूरू असताना अचानक तिसऱ्या मजल्यावरून तरूणाच्या अंगावर एसी कोसळतो.
हे वाचलं का?
तरुणाच्या अंगावर हा एसी इतक्या जोरात कोसळतो त्याचा जागीच त्याचा मृत्यू होतो. ही संपूर्ण घटना पाहून सोसायटीच्या आवारात फिरत असलेल्या तरूणांना मोठा झटका बसला होता. या घटनेनंतर तरूणाला लगेचच नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे घोषीत केले होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.
हे ही वाचा : Uddhav Thackeray : ठाकरेंचं 'मिशन मुंबई'! 36 विधानसभा मतदारसंघांसाठी ठरली रणनिती
दरम्यान ही संपूर्ण घटना सोसायटीत लावलेल्या सीसीटीव्ही कैद झाली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या देखील काळजाचा ठोका चुकतोय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT