‘फडणवीसांनी हात ओढला पण…’, ‘त्या’ व्हिडीओची नेमकी सत्यता आली समोर
नागपूरमधील काही भागांना पावसाचा फटका बसून पुराचे पाणी दहा हजारपेक्षा जास्त घरात घुसले होते. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या भागाचा दौरा केला. त्यावेळी त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, त्यानंतर त्यांच्यावर टीका होतानाच त्या व्हिडीओची सत्यता समोर आली आहे.
ADVERTISEMENT
Deveendra Fadnavis : नागपूरमध्ये झालेल्या पावसामुळे अंबाझरी तलावामुळे (Ambazari Lake) शहरातील काही भागाला पुराचा फटका बसला. 10 हजारांपेक्षा अधिक घरात पाणी शिरल्यामुळे लोकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी नागपूरमधील पूर (Nagapur Flood) परिसराचा दौरा केला. तो दौरा करताना देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला आहे. त्यानंतर विरोधकांनीही (Opposition Party ) त्यांच्यावर प्रचंड टीका केली आहे. त्यामुळे त्या व्हिडीओची सत्यता काय हे प्रवीण चौधरी (Praveen Chaudhari) यांनी सांगितली आहे.
ADVERTISEMENT
व्हिडीओची नेमकी सत्यता
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरस्थितीची पाहणी करताना प्रवीण चौधरी यांच्या हाताला ओढून आपल्याबरोबर घेतल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधकांनी तो व्हिडीओ व्हायरल करत फडणवीसांनी पूरग्रस्त नागरिकाला रागाने ओढले असल्याची टीका करण्यात आली. त्यानंतर ज्या नागरिकाचा हात पकडून फडणवीसांनी ओढले होते. त्या प्रवीण चौधरी यांनीच त्या व्हिडीओची सत्यता सांगितली आहे.
हे ही वाचा >> ‘बाकीच्या कारखान्यांना मदत, माझ्या…’, पंकजा मुंडेंनी सांगितली मनातील खदखद
सुरक्षेचा गरडा
प्रवीण चौधरी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी हात ओढल्याचा तो व्हिडीओची सत्यता सांगताना ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या भागाचाही दौरा करावा, पूरस्थिती पाहावी अशी आमची इच्छा होती. देवेंद्र फडणवीस ज्यावेळी आमच्या परिसरात आले त्यावेळी सुरक्षेचा गरडा त्यांच्या भोवती होता. मात्र त्यांच्या कारसमोर काही नागरिक थांबले होते, त्यावेळी मीही त्यांच्या कारसमोर थांबलो होतो.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
फडणवीसांनी हात पकडला
त्यावेळी आमच्याही भागाचा दौरा त्यांनी करावा, आमच्या घरांची परिस्थितीही त्यांनी पाहावी अशी आमची इच्छा होती. त्यासाठी आमचा आग्रह होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे कारमधून उतरुन आमच्याकडे आले, आणि त्यांनी माझा हात पकडून आपल्याकडे बोलवून घेतले. कारण त्यावेळी त्यांच्याभोवती पोलिसांची सुरक्षा होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> पंकजा मुंडेंसाठी सुप्रिया सुळे सरसावल्या; अमित शाहांवर ‘बाण’, काय म्हणाल्या?
रागाने नाही, विचारपूस केली
त्या सुरक्षेच्या गरड्यातून मला बाहेर काढत त्यांनी आमच्या घराची पाहणी केली, परिस्थितीची पाहणी केली. मात्र ज्या प्रकारे विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. ते रागावले होते, किंवा रागाने मला ओढले, ढकले अशी जी टीका केली जाते आहे. तसे काहीही झाले नाही असंही प्रवीण चौधरी यांनी स्पष्ट केले. प्रवीण चौधरी यांनी त्या व्हिडीओची खरी गोष्ट सांगून त्या वादावर पडदा टाकण्याचेच काम केले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT