Maharashtra Rain: पावसाचा धुमाकूळ, कोणत्या धरणातून किती सोडलं पाणी?
Maharashtra Dam Water Update: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे अनेक धरणं ही 100 टक्के भरली असून आता त्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस
पाहा कोणत्या धरणातून किती पाणी सोडलं
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक धरणं ओव्हरफ्लो
Maharashtra Dams: मुंबई: जून महिन्यात पावसाने बरीच ओढ दिल्यानंतर जुलै महिन्यात मात्र महाराष्ट्रात सर्वदूर चांगला पाऊस झाला आहे. त्यातच मागील दोन दिवसांपासून अनेक विभागात तुफान पाऊस बरसत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक धरणं ही ओव्हरफ्लो झाली आहेत. जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या धरणातून आता किती वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. (heavy rain in maharashtra how much water was released from which dam)
ADVERTISEMENT
पाहा महाराष्ट्रातील कोणत्या धरणातून किती पाणी सोडण्यात येतंय..
पुणे विभाग
- खडकवासला धरणातून 1007 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
- वीर धरणातून 61,488 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
- वारणा धरणातून 204 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
- राधानगरी धरणातून 7112 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
- कोयना धरणातून 21,050 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
- कृष्णा-कण्हेर धरणातून वेण्णा नदी पात्रात 5 हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग
हे ही वाचा>> Mumbai Rain: मुंबईत पुन्हा 26 जुलै?, पावसाचा LIVE Video पाहून भरेल धडकी!
ठाणे विभाग
- मोडकसागर धरणातून 5000 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
नागपूर विभाग
- इटियाडोह धरणातून 508 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
- बाघ-शिरपूर धरणातून 223.33 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
- गोसीखुर्द धरणातून 8902 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
- इरई धरणातून 462 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
- निम्न वर्धा धरणातून 128 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
हे ही वाचा>> Rain Update: पावसाचा कहर, पाहा तुमच्या जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी आहे का?
अमरावती विभाग
- बेंबळा धरणातून 258 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
नाशिक विभाग
- दारणा धरणातून 214 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
- हतनूर धरणातून 856 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू
यामुळे सध्या अनेक जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात आपत्ती आणि व्यवस्थापन विभागाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT