Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खूशखबर! शिंदे सरकार महिलांना देणार आणखी एक गिफ्ट
Eknath Shinde News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपुर्ती सोहळा आज साताऱ्यामध्ये पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लाडक्या बहिणींचा आनंद द्विगुणित करणारी बातमी
लाडकी बहिण योजनेचे पैसै दुप्पट होणार आहेत.
''तुम्ही टेन्शन घेऊ नका सावत्र भावांना टेन्शन द्या''
Eknath Shinde News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरूवात झाली आहे. टप्याटप्याने महिलांच्या खात्यात हे पैसै जमा होतायत. उद्या 19 तारखेपर्यंत 3000 रूपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींचा चेहरा उजळून निघाला आहे. असे असतानाच आता लाडक्या बहिणींचा आनंद द्विगुणित करणारी बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींच्या योजनेचे (mukhymantri ladaki bahin yojana scheme) पैसै दुप्पट होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना याबाबचे विधान केले आहे. त्यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे. (ladki bahin yojana scheme eknath shinde big statement on satara rally mukhymantri ladaki bahin yojana scheme)
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपुर्ती सोहळा आज साताऱ्यामध्ये पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, 'आम्ही आता 1500 रुपयांनी योजना सुरू केली आहे, पुढे सरकारची ताकद वाढली की या दीड हजाराचे 3 हजार किंवा त्यापेक्षा जास्त होईल. त्यामुळे लाडकी बहिण योजनेचे पैसै दुप्पट होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी लाडक्या बहिणींना म्हटलं की ''तुम्ही टेन्शन घेऊ नका सावत्र भावांना टेन्शन द्या''.
हे ही वाचा : Eknath Shinde : ''...म्हणून फडणवीसांच्या अटकेचा डाव रचला होता'', शिंदेंचा खळबळ उडवणारा गौप्यस्फोट
"येताना सर्व ठिकाणी महिलांचा महासागर पाहायला मिळाला. सगळ्यात जास्त भगिनी या कार्यक्रमात पाहायला मिळाला. मी या साताऱ्याच्या भूमी पुत्र आणि इथे कार्यक्रम होतोय हे माझ्यासाठी भाग्याचे आहे. आपल्या समोर नतमस्तक होतो मी भाग्यवान आहे मला आपल्या सारख्या बहिणी मिळाल्या. हा कार्यक्रम महाराष्ट्रात सुपर डूपर हीट झाला आहे. लाडक्या बहिणींसाठी पूर्ण आर्थिक वर्षात 35 हजार कोटींची तरतूद देण्यात आली आहे," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
"विरोधक दोन चार महिन्यांतून सरकार पडेल म्हणायचे पण अस झालं नाही. मी सामान्य कुटुंबातून आलेला मुख्यमंत्री आहे, सोन्याचा चमचा घेऊन आलेला नाही. आम्ही आता 1500 रुपयांनी योजना सुरू केली पुढे सरकारची ताकद वाढली की या दीड हजाराचे 3 हजार किंवा त्यापेक्षा जास्त होईल. आम्हाला फक्त 3000 घेऊन थांबायचं नाही, आम्हाला लखपती झालेली बहीण बघायची आहे," असेही मुख्यमंत्री एकनाथ शिदे म्हणाले.
"ही ओवाळणी दर महिन्याला भावांच्या कडून मिळणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका सावत्र भावांना टेन्शन द्या. आपल्या बहिणींच्या बद्दल उद्गार काढताना विरोधकांना थोडी लाज वाटली पाहिजे. खात्यात पैसे आल्यावर विरोधकांची थोबाड पांढरी फटक झाली. आपली बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी. 17 ऑगस्ट हा दिवस मुख्यमंत्री लाडकी बहीण दिन म्हणून आपण साजरा करूया. या योजनेच्या यशाने वेडे झालेल्या विरोधकांना आपल्या साताऱ्याचे प्रसिद्ध कंदी पेढे खायला पाठवा, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Satara Accident : रक्षाबंधनासाठी निघालेल्या भावावर काळाचा घाला, रस्ते अपघातात झाला दुदैवी मृत्यू
ADVERTISEMENT