Vinayak Mete Nephew: दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पुतण्याची आत्महत्या, नेमकं कारण काय?
Vinayak Mete Nephew Sachin Mete Suicide: शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायकराव मेटे यांच्या पुतण्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे. या घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT
Vinayak Mete Nephew Suicide: रोहिदास हातागळे, बीड: शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या पुतण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. अवघ्या 34 वर्षांच्या असलेल्या सचिन मेटे (Sachin Mete) याने आपल्या राहत्या गावी (राजेगाव, ता. केज, जिल्हा बीड) येथे गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती समजताच परिसरात खळबळ उडाली आहे. (late leader vinayak mete nephew sachin mete suicide in beed what is the exact reason)
ADVERTISEMENT
सचिन मेटे (वय 34 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. वडाच्या झाडाला दोरीने गळफास लावून त्याने ही आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर गावात घबराटीचं वातावरण पाहायला मिळत आहे. विनायक मेटे यांचे भाऊ त्रिंबक मेटे यांचा सचिन हा मुलगा आहे.
सचिनने टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास आता पोलीस करत आहेत. दोन महिन्यांपूर्वीच विनायक मेटे यांच्या निधनाला वर्ष पूर्ण झाले होते. दरम्यान, सचिन याने केलल्या आत्महत्येमुळे मेटे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मागील वर्षी रस्ते अपघातात विनायक मेटेंचा अपघाती मृत्यू झाला होता. विनायक मेटेंच्या मृत्यूच्या धक्क्यातून मेटे कुटुंबीय सावरत असतानाच सचिनच्या आत्महत्येमुळे कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा>> Gadchiroli: कुंभारे कुटुंबाला सुनेने ‘या’ विषाचा भरवला घास, ‘यासाठी’ काढला काटा!
सचिनने नेमकी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप तरी समजू शकलेलं नाही. तसेच त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यामुळे या आत्महत्येबाबत गूढ कायम आहे.
दरम्यान, सदरील मृतदेह नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे. त्यातून मृत्यू नेमका कसा झाला हे समजू शकणार आहे.
ADVERTISEMENT
विनायक मेटेंचा झालेला अपघाती मृत्यू
मराठा समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे पाच वाजता मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात झाला होता. यात विनायक मेटे यांचं निधन झालं होतं. यानंतर त्यांच्या अपघाताची सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना दिले होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> फीसाठी पैसे नाही म्हणून विद्यार्थ्यांची आत्महत्या, जरांगे-पाटलाच्या सभेला लावलेली हजेरी!
सीआयडीच्या चौकशीमध्ये विनायक मेटे यांच्या गाडीचा चालक 130-140 ताशी किलोमीटर वेगाने गाडी चालवलत असल्याचे समोर आले होते. गाडीचा अपघात होण्याआधी चालकाने दुसरी गाडी ओव्हरटेक करत असतानाही आपली गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातच हा अपघात झाला होता. असेही सीआडीच्या तपासात समोर आलं. यानंतर चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT