पर्यटकांनी जीवाची मागितली भीक, त्यांना वाटलं Indian आर्मी...; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल

मुंबई तक

Pahalgam Terror Attack Viral Video : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांचे हृदयस्पर्शी व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले.

ADVERTISEMENT

Pahalgam Tourist Viral Video
Pahalgam Tourist Viral Video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'आम्ही इंडियन आर्मी आहोत, तुमच्या सेफ्टीसाठी आलोय'

point

इंडियन आर्मीने पर्यटकांना दिलासा दिला

point

पर्यटक आणि इंडियन आर्मी यांचा भावनिक व्हिडीओ व्हायरल

Pahalgam Terror Attack Viral Video : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांचे हृदयस्पर्शी व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले. ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या ठिकाणाहून सहा किलोमीटर दूर पर्यटक त्यांचा जीव वाचवण्यासाठी पळत होते. त्याच दरम्यान महिला आणि लहान मुलांचा एक ग्रुप भारतीय सेनेच्या जवानांसमोर आला.

महिला सैनिकांना पाहून घाबरल्या आणि त्यांच्या मुलाच्या जीवाची भीख मागू लागल्या. या महिलांनी सैनिकांनाही दहशतवादी समजत होत्या. त्यानंतर सैनिकांनी महिलांना सांगितलं की, आम्ही इंडियन आर्मी आहोत. तुमची सुटका करायला आलो आहोत. त्यावेळी महिलांना रडू कोसळलं आणि त्यांनी सैनिकांना सांगितलं, आमच्या डोळ्यासमोर पतीला गोळ्या झाडल्या.

'आम्ही इंडियन आर्मी आहोत, तुमच्या सेफ्टीसाठी आलोय'

दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर तातडीनं महिलांनी त्यांच्या मुलांना सोबत घेऊन रस्त्याने चालल्या होत्या. यावेळी महिलांना त्यांच्या समोर आर्मीच्या ड्रेसकोडमध्ये एक व्यक्ती दिसला. त्या सैनिकांना पाहून महिला घाबरल्या. त्यावेळी सैनिकांनी त्या महिलांना सांगितलं, आम्ही इंडियन आर्मी आहोत. तुमच्या सेफ्टीसाठी आलो आहोत. त्यानंतर महिला जोर जोरात रडू लागल्या. हा हल्ला सहा दहशतवाद्यांनी केला होता, अशी माहिती आहे. हे दहशतवादी पोलीस आणि आर्मीच्या ड्रेसकोडमध्ये होते. त्यामुळे महिला सैनिकांच्या खऱ्या बटालियनला पाहून घाबरल्या.

हे ही वाचा >> पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी बॅगमध्ये काय आणलेलं? समोर आली मोठी माहिती

सैनिकांनी मुलांना दिलं पाणी 

व्हिडीओत पाहू शकता की, सैनिकांनी महिलांना विश्वासात घेतलं. त्यानंतर घाबरलेल्या मुलांना पाणी दिलं. तसच त्यांच्यावर प्राथमिक उपचारही केले. व्हिडीओत पाहू शकता की, एक सैनिक टूरिस्टला म्हणतो, तुम्ही इथे बसा..कुठून आला आहात? महिला सांगते, आम्ही हैदराबादहून आलो आहोत. महिला आणि मुलं भीतीच्या छायेत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. 

हे ही वाचा >> TRF: 'मोदी को जाके बताओ...', असं म्हणत पर्यटकांना ठार मारणारे नराधम कोणत्या संघटनेचे?

हे वाचलं का?

    follow whatsapp