Maharashtra Band : उद्या 'महाराष्ट्र बंद', नेमकं घडलंय तरी काय?

मुंबई तक

Maharashtra Band August 24 : महाविकास आघाडीने 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या महाराष्ट्र बंदला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे या महाराष्ट्र बंद दरम्यान नेमकं काय सुरू राहणार आहे आणि काय बंद राहणार आहे? हे जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीने  24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
maharashtra band 2024 what exactly will be open and closed during maharashtra bandh read full story
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उद्या 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंद असणार

point

महाविकास आघाडीने दिली महाराष्ट्र बंदची हाक

point

महाराष्ट्र बंद दरम्यान काय बंद, काय राहणार सुरु

Maharashtra Band August 24 : बदलापूरमधील एका शाळेमध्ये दोन शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने  24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या महाराष्ट्र बंदला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे या महाराष्ट्र बंद दरम्यान नेमकं काय सुरू राहणार आहे आणि काय बंद राहणार आहे? हे जाणून घेऊयात. (maharashtra band 2024 what exactly will be open and closed during maharashtra bandh read full story)

महाराष्ट्र बंदमध्ये महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना उबीटी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सामील होणार आहे. या बंद दरम्यान शाळा, कॉलेज,बँका,बस सेवा, रेल्वे सेवा या सुरू राहणार आहेत की बंद असणार आहेत. हे जाणून घेऊयात. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : '...तर योजनेचे 4500 हातातून गमावून बसाल', आताच 'ही' गोष्ट करून घ्या

उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या बंदची सविस्तर माहिती दिली आहे. "उद्याचा बंद हा राजकीय कारणसाठी नाही. उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी असणार आहे. सर्व महिला आणि पालकांना असं वाटतंय की आपली मुलगी शाळेत सुरक्षित राहिल का? अनेक मातांना वाटतंय, कामाच्या ठिकाणी गेल्यावर आपण सुरक्षित राहू का? त्याच अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद आहे. तसेच उद्याचा बंद हा दुपारी 2 वाजेपर्यंत पाळायचा आहे? अशा सूचना ठाकरेंनी केल्या आहेत. 

काय राहणार सुरु? 

बंदच्या काळात नेमक्या कोणत्या गोष्टी सुरू राहणार आहे? यावर उद्धव ठाकरे म्हणाले, आजपर्यंत जे बंद झाले आहेत, तसाच उद्याचा बंद राहिल.  या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा चालू राहणार आहे. जसे रुग्णवाहिका सेवा, वृत्तपत्र, फायब्रिगेड चालू राहतील. सणासुदीचे दिवस आहे, दहीहंडी उत्सव आहे, या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर उद्याचा बंद दुपारी २ वाजेपर्यंत पाळावा, अशाही सूचना त्यांनी केल्या आहेत. 

हे ही वाचा : Badlapur: 'अक्षय शिंदेचं 4 महिन्यापूर्वीच दुसरं लग्न झालेलं, पहिली बायको...', समोर आली नवी माहिती

काय बंद राहणार? 

दरम्यान उद्याच्या बंद दरम्यान रेल्वे सेवा किंवा बस सेवा सुरू राहणार आहेत का? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. रेल्वे किंवा बस सेवेबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही आहे. त्यामुळे रेल्वे किंवा बससेवा सुरु राहतील असा अंदाज आहे. यामुळे नागरीकांची गैरसोय होण्याची शक्यता कमी आहे. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp