Maharashtra Rain News: मुसळधार पावसामुळे राज्यात कोणत्या 8 जिल्ह्यातील शाळांना सुट्टी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोणत्या 8 जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर?

point

पुणे-रायगड-रत्नागिरीतही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुट्टी जाहीर

point

कोल्हापुरात शाळा आणि महाविद्यालयांना 2 दिवस सुट्टी

Maharashtra School Holiday Update : राज्यातील काही भागांमध्ये गुरुवारी (25 जुलै 2024) रात्रीपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. परंतु काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हीच बाब लक्षात घेत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या 8 जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी आहे. (Maharashtra Rain News Due to heavy rain these 8 districts of the state have declared holiday for schools on 26 July 2024)

'या' आठ जिल्ह्यांतील शाळा बंद

आज (26 जुलै 2024) हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. यामुळे आठ जिल्ह्यांमधील शाळा-महाविद्यालये बंद राहणार आहे. त्यात ठाणे, नवी मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, कोल्हापूर, सांगली जिल्ह्याचा समावेश आहे.

हेही वाचा : Rain Update: रात्र वैऱ्याची... पहाटे 'या' धरणातून आणखी वेगाने सोडणार पाणी!

अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर शाळा कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने ठाणे शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसंच कल्याण डोंबिवलीमधल्या सर्व शाळांनाही आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातीलही सर्व माध्यमांच्या शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पुणे-रायगड-रत्नागिरीतही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुट्टी जाहीर

पुण्यात गुरुवारी (25 जुलै) एकाच दिवसात 7 जणांचा मृत्यू झाला. आजही पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसेच नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, सातारा या जिल्ह्यांनाही रेड अलर्ट देण्यात आला आहे. सांगलीमधल्या कृष्णा नदीच्या पाण्याचे पातळीमध्ये वाढ झाली आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी 34 फुटांवर पोहचली आहे. तर पाऊसाचा जोर कायम आहे. यामुळे 8 जिल्ह्यांतील शाळा आज बंद राहतील.

हेही वाचा : Maharashtra Rain: पावसाचा धुमाकूळ, कोणत्या धरणातून किती सोडलं पाणी?

कोल्हापुरात शाळा आणि महाविद्यालयांना 2 दिवस सुट्टी
 

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच रहिवाशी भागात पाणी शिरल्याने अनेक नागरिकांचं स्थलांतरही करण्यात आलंय यामुळे कोल्हापूरच्या शाळा आणि महाविद्यालयांना दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे 26 आणि 27 जुलै असे दोन दिवस शाळा बंद राहतील. 

ADVERTISEMENT

हेही वाचा : Rain Update: पावसाचा कहर, पाहा तुमच्या जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी आहे का?

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडया, सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक-माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित आणि विना अनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये, व्यवसाय प्रशिक्षण केंद्रातल्या विद्यार्थ्यांना सुट्टी राहील. 

ADVERTISEMENT


 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT