Maharashtra Weather: मुंबईत तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी, 'या' जिल्ह्यांना IMD चा महत्त्वाचा इशारा!
Maharashtra Weather News : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, पुन्हा एकदा राज्याच्या काही भागांमध्ये आज पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार असल्याचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट
पुन्हा एकदा राज्याच्या काही भागांमध्ये आज पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार असल्याचा अंदाज
तुमच्या जिल्ह्यात पावसाची स्थिती काय असेल?
Maharashtra Weather News Update: राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, पुन्हा एकदा राज्याच्या काही भागांमध्ये आज पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार असल्याचा अंदाज आहे. आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तण्यात आला आहे. तुमच्या जिल्ह्यात पावसाची स्थिती काय असेल? जाणून घ्या... (maharashtra Weather update live news today 20 august 2024 weather report of Mumbai pune and these districts)
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे, आज हवामान विभागाकडून (IMD) राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे. शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ आकाश आणि हलका ते मध्यम पाऊस/ मेघेगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33°C आणि 27°C च्या आसपास असेल.
हेही वाचा : Sharad Pawar : ''संभाजी भिडे वगैरे प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची...'', पवार भडकले!
'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा!
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे वाचलं का?
दक्षिण कोंकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यासह, मध्य महाराष्ट्रात देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी पावसासोबत वादळी वारा आणि विजांचा कडकडाट होईल असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Gautami Patil: गौतमी पाटीलला जामीन मंजूर, पण... का चढावी लागलेली कोर्टाची पायरी?
हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट!
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, सातारा, तसेच सांगली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. दुसरीकडे विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT