Manoj Jarange : “आम्हाला नाटक…”, सदावर्तेंच्या गाड्या फोडल्यानंतर जरांगे संतापले

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Maratha Reseravtion : Manoj Jarange Patil Reaction after gunaratna sadavarte vehicles vandalised incident
Maratha Reseravtion : Manoj Jarange Patil Reaction after gunaratna sadavarte vehicles vandalised incident
social share
google news

Manoj Jarange Patil vs Gunaratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या दोन गाड्या मराठा आंदोलकांनी फोडल्या. या तोडफोडीचं समर्थन करत नाही, अशी भूमिका स्पष्ट करताना मनोज जरांगे पाटील सरकारवर संतापले. मराठा आरक्षण देण्याला कोणाचा विरोध आहे, याची यादीच काही दिवसांत जाहीर करू असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. सदावर्तेंच्या गाड्यांच्या तोडफोडीवर जरांगे काय म्हणाले वाचा…

ADVERTISEMENT

अंतरवाली सराटी गावात माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “मला अधिकृत काहीच माहिती नाही. आताच प्रसारमाध्यमांतून माहिती मिळाली. कुणाच्या गाडीला धक्का लागला की, लावला आम्हाला माहिती नाही. परंतु मराठा समाज शांततेत आंदोलन करतोय. हजारो गावात करतोय. आताही चालू आहे. सरकारने मराठा आरक्षणाचा विषय ताबडतोब सोडवावा. तोडफोडीचा जो प्रकार झाला आहे, त्याचं समर्थन करत नाही”, असं सांगत मनोज जरांगेंनी भूमिका स्पष्ट केली.

Maratha Reservation : “मराठ्यांची लेकरं मोठी होऊ नयेत म्हणून प्रयत्न करताहेत”

“मराठा समाज शांततेतच आहे. हजारो गावांत आंदोलन करत आहे. मराठा समाज वेगळं आंदोलन करणार नाही. झालेला प्रकार कुणी केलाय, हे आम्हाला माहिती नाही. आमच्याकडून सरकारचे खूप लाड केले. मराठ्यांनी ७० वर्षात त्यांचे खूप लाड केले. खूप मोठं केलं. त्यांची लेकरंबाळं मोठी केली. आमची पोरं मोठी करायची आहेत. त्यांना वाटतं मराठ्यांची लेकरं मोठी होऊ नयेत. याच्यासाठी चारही बाजूने प्रयत्न करताहेत”, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Gunaratna Sadavarte यांच्या गाड्या बीडमधील तरुणांनी फोडल्या, सरपंचाला अटक

“याचं षडयंत्र मराठा समाज शांततेच्या आंदोलनाने उधळून लावणार. यांचे कोण कोण श्रद्धेय मराठा समाजाला आरक्षण मिळू देत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. मराठा समाजाने श्रद्धेयांना खूप मोठं केलं. ते सध्या विमानाने फिरतात. त्यांचे लेकरं ऐशोआरामात जगताहेत. आमचे आताही लेकरांना शिकवून मोठं करण्याचे स्वप्न बघताहेत”, असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

“आरक्षण द्यायचं नव्हतं तर महिनाभर वेळ कशाला घेतला?”

“तुम्हाला आरक्षण द्यायचं नव्हतं तर कशाला महिनाभराचा वेळ घेतला? तुम्ही म्हणायचं ना की, ५० वर्षे वेळ देता का? आम्ही चार दिवसांचा वेळ दिला. तुम्ही म्हणालात कायदा होणार नाही. तुम्ही म्हणालात एक महिन्याचा वेळ द्या. मागणीप्रमाणे टिकणारं आरक्षण देतो. आम्हाला नाटक शिकवताहेत का? आणखी वेळ पाहिजे आणि अमूक पाहिजे”, असा सवाल जरांगे पाटलांनी सरकारला केला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Surat Diamond Bourse: गुजराती व्यापाऱ्यांचा मुंबईला प्रचंड मोठा धक्का, ‘हिरा’ व्यापार हिरावला!

“घराघरातील मराठ्यांनी ओळखलं आहे की, आपली लेकरं मोठी व्हावीत, हे यांना वाटतं नाही. त्यामुळे मराठ्यांनी ठरवलं आहे की, आम्ही तुमच्या दारात येत नाही. तुम्ही आमच्या दारात येऊ नका. किती सोपा विषय आहे. कशाला येता आमच्या दुःखावर मीठ चोळायला? मराठे शांततेत आंदोलन करताहेत, करत राहणार”, असा निर्धार मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

मनोज जरांगेंचं श्रद्धेयवरून टीकास्त्र

‘तुम्ही जे श्रद्धेय म्हणतात, हेच आरक्षण मिळू देत नाहीयेत का?’ या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, “असे लय मोठे आहेत. थोड्या दिवसांत यादी येणार आहे. आम्ही तुम्हाला देऊ.”

हे ही वाचा >> “शिवतीर्थावर अर्धवटरावांनी…”, उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर

तुमच्यावर कारवाई व्हावी म्हणून सदावर्ते उपोषण करणार आहेत, याबद्दल मनोज जरांगे यांना विचारण्यात आलं. त्याला उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, “आमच्यावर कारवाई व्हावी हे ते लय दिवसांपासून म्हणताहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सरकार नाही चालणार. ते म्हणतात तसंच नाही होणार. त्यांनी सांगितलं होतं साहेबांनी हिंसाचार करणार आहेत. मग त्यांच्याच कुणाला घडवून आणायचा होता का? त्यांचे खूप मालक आहेत. खूप उंचीवर आहेत, असं लोक म्हणतात. त्यांचं तिकडं लय चालतं असं म्हणतात. दिल्लीकडे. आता आम्हाला आरक्षण द्यायला पाहिजे होतं त्यांनी. ते काय आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. त्यांना काय करायचं ते करू द्या. सरकार मराठा समाजासोबत राहीन, ही आम्हाला आशा आहे”, असे जरांगे पाटील म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT