Raju Patil: ‘हात्ती जेला ना शेपुट रला…’, मुख्यमंत्री शिंदेंना थेट ‘आगरी’त पत्र

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

MNS Raju Patil: कल्याण: नवी मुंबई विमानतळला (Navi Mumbai Airport) लोकनेते स्व. दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचेच नाव लवकरात लवकर द्यावे. या मागणीसाठी सरकारला खडसावणारं पत्रच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी लिहिलं आहे. मात्र, हे पत्र त्यांनी चक्क आगरी भाषेत लिहलं असून ते मुख्यमंत्र्यांना धाडलं आहे. आता हेच पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (mns mla raju patil has written a letter cm eknath shinde in aagri language issue of renaming navi mumbai airport name )

ADVERTISEMENT

मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आगरी भाषेत लिहलेलं ‘ते’ पत्र जसच्या तसं…

महोदय, २५ ऑगस्ट २०२२ रोजी आपून इधानसभेर जाहीर केलता की नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय इवानतलाला लोकनेते दि.बा.पाटील ह्यांचे नाव दिला जावाला लागणारा परस्ताव केंद्र सरकारचेकर पाठवला जाल, यो परस्ताव इधानमंडलाचे दोनी सभागुरहान मांडून मान्यता बी मिलाली तरीबी आजुक तो परस्ताव केंद्र सरकारचेकर पाठोला जेला नय. हा विलंब करण्याचे मागं, ‘चालते गारीला खील लावाचा’ कोनचा क हेतू आसल माइती नाय.

हे ही वाचा>> Neha Shourie : 100 कोटीचा घोटाळा उघड करणाऱ्या ड्रग इन्स्पेक्टरच्या मर्डरची Inside Story

पून ज्या नेत्याचे मुलं शेतकऱ्यांच्या जनिमी रल्या अशे लोकनेते दि.बा. पाटील ह्यांचे नाव इवानतलाला मिलावा याचेसाठी समाज बांधवावी ‘आंगाचा तिलपापर’ करुनशा उभारलेला ‘शांततापूर्ण’ लढा आपून बगला ना येकूनच समाजबांधवांच्या भावना कती तीव्र हात या अनुभवूनशा मुसलाला कोम फुटावा तसा आपून लोकनेते दि.वा. पाटील यांचा नाव न देवाचा आपला हट्ट मागे झेतला. त्याचे बद्दल तुमचा कवतुक करावा तवरा कमीच ह. शिवाय कई बी झला तरी आगरी कोळी समाज बांधवाच्या भावनांना तुम्ही आलवा देऊन कोवला नी कारु शकत नाय ह्याची सगळ्यांनाच खात्री ह.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पून तरीबी ज्या कई चालले त्यान ‘ताकाला जावून भांडा लपवाचा’ काम चालले का असा उगाचच संशय मनात येते, कोनीबी जर क आगरी-कोळी समाजाचे टोंडाला पानी पुसाचा इचार करीत आसल तर आपुन त्याला तडाखेबंद जाव इचराल यान शंकाच नाय, नय तर बाराभाईची शेती लागल क हाती? असा नको होवाला. ज्यांच्यावं जबाबदारी ह त्यावी पुढाकार झेवाला कुचराई केली असल त आपून आवरे येला दिल्लीला जाता, येखाद येलेला आम्हा समाजबांधवाची ही फाईल नेवाला पका कई जर (जड) जाल असा वाटत नाय कारन ‘भरले गारीला सुप जर नसतं.’ दिवंगत लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी पाटी बगाची छाती पुरं करुन ओर आगरी कोळी बांधवांना लागले, हात्ती जेला ना शेपुट रला असा दिसाला लागला त परत आमचे बांधवांचे कालजाला इंगोल (विस्तच) पेट झेल ना आमची उगाच ओरातन नको. आवरीच नम्र इनंती करासाठी यो पत्रप्रपंच.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT