Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींची लूट, कागदपत्रांसाठी पैसै घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

 mukhyamantri ladaki bahin yojana government employee take money from women for documentation hingoli news
महिलांकडून पैसे उकळण्याचे प्रकार देखील समोर आले आहेत.
social share
google news

Ladaki Bahin Yojana Fraud : ज्ञानेश्वर पाटील, हिंगोली : राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेतून महिलांना दरमहा 1500 रूपये मिळणार आहे. या योजनेसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी महिलांची तलाठी कार्यालय, सेतू आणि आपले सरकार या कार्यालयात महिलांची गर्दी जमली आहे. या महिलांकडून पैसे उकळण्याचे प्रकार देखील समोर आले आहेत. आता अशीच घटना हिंगोलीत देखील घडली आहे. आणि पैसै उकळतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. (mukhyamantri ladaki bahin yojana government employee take money from women for documentation hingoli news) 

ADVERTISEMENT

मध्यप्रदेश सरकारच्या लाडली बहना योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेला राज्यभरातून प्रतिसाद मिळतोय. या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्राची जमवाजमव करण्यासाठी महिलांनी सरकारी कार्यालयात गर्दी करायला सुरुवात केली आहे. 

हे ही वाचा : तारीख ठरली! वसंत मोरे 'या' दिवशी ठाकरे गटात प्रवेश करणार

या दरम्यान अनेक कार्यालयात महिलांकडून पैसे उकळल्याचे प्रकार देखील समोर आले आहे. आता हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा गावात देखील योजनेसाठी लागणारे कागदपत्रे देण्यासाठी सरकारी बाबू महिलांकडून पैसे उकळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. 

हे वाचलं का?

डोंगरकडा आणि भाटेगाव  ग्रामपंचायतीत मुकुंद घनसावंत हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. या  घनसावंत यांच्याकडे जेव्हा गावातील महिला योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी कागदपत्रे मागतात, तेव्हा या महिलांकडून ग्रामसेवक एका कागदपत्रासाठी प्रत्येकी 50   आरोप गावातील ग्रामस्थांनी केला आहे. 

दरम्यान ग्रामसेवक महिलांकडून पैसे घेतानाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओत चक्क ग्रामसेवक महिलांकडून घेतलेले पैसे टेबल वर मोजतांना दिसतोय. हा व्हिडिओ व्हायरल होता सर्व स्तरातुन यां ग्रामसेवकावर  कारवाईची मागणी होऊ लागली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : क्रिकेटप्रेमींच्या गर्दीत अडकला टीम इंडियाचा विजयरथ, कधी निघणार परेड?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT