Mumbai Local : बाईईई हा काय प्रकार? भरगच्च गर्दीत लोकलमध्ये महिला खेळल्या गरबा; Video व्हायरल
Mumbai local train Video Viral : सध्या सोशल मीडियावर नवरात्रीनिमित्त गरब्याच्या व्हिडिओचा ट्रेंड आहे. त्यामुळे गरब्याचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतायत. अशात आता एक गरब्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतं आहे. या व्हिडिओत नेमकं काय आहे? आणि हा व्हिडिओ इतक्या प्रचंड वेगाने का व्हायरल होत आहे?
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुंबई लोकलमध्ये महिलांना गरबा
गरबा खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल
पण गर्दीत कसा खेळला गरबा?
Mumbai local train Video Viral : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ हे खूपच धक्कादायक असतात. सध्या सोशल मीडियावर नवरात्रीनिमित्त गरब्याच्या व्हिडिओचा ट्रेंड आहे. त्यामुळे गरब्याचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतायत. अशात आता एक गरब्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतं आहे. या व्हिडिओत नेमकं काय आहे? आणि हा व्हिडिओ इतक्या प्रचंड वेगाने का व्हायरल होत आहे? हे जाणून घेऊयात. (mumbai local viral video passenger women play garba in ladies compartment video goes viral navratri 2024)
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ मुंबईच्या लोकल ट्रेनचा आहे. या व्हिडिओत महिला गरबा खेळताना दिसल्या आहे. त्यामुळे मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिला गरबा खेळत असल्याने हा व्हिडिओ व्हायरल होतं आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दसरा, दिवाळी झाली गोड! 4500 नंतर 3 हजार खात्यात जमा, तुमचे आले का?
मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने हा व्हिडिओ त्याच्या कॅमेरात कैद केला आहे. त्यानंतर त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडिओत ज्या लोकलमध्ये पाय ठेवायला जागा नसते, भरगच्च अशी गर्दी असते, त्या लोकलमध्ये महिला प्रवाशांनी गरबा खेळला आहे. महिलांच्या कपार्टमेंटमध्ये महिलांनी हा गरबा खेळला आहे.
हे वाचलं का?
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता काही महिला या ट्रेनमध्ये बसल्या आहेत. तर काही महिला या उभ्या राहून गरबा खेळताना दिसतात. अतिशय कमी असलेल्या या जागेत महिला उत्कृष्टपणे गरबा खेळत आहे. त्यामुळे महिलांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
आमची मुंबई या इस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. काहींनी आमची मुंबई म्हणत मुंबईकर असल्याचा अभिमान व्यक्त केला. तर काहींनी हा सण नाही तर आमचं इमोशन आहे, असे म्हटले आहे. असा अनेक भन्नाट कमेंट आणि लाईक्सचा पाऊस या व्हिडिओवर पडतोय. या व्हिडिओची खूप चर्चा आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 4500 अजूनही जमा झाले नाही, 'ही' यादी आताच चेक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT