Mumbai Rain : मुंबईकरांनो, घराबाहेर पडू नका!, IMDचा इशारा काय?
Mumbai Rain News : भारतीय हवामान खात्याने मुंबईकरांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील काही तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनो गरज नसेल तर घराबाहेर पडणे टाळा.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मुंबईकरांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबईकरांनो गरज नसेल तर घराबाहेर पडणे टाळा.
Mumbai rain Update : मुंबईकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईला आज सकाळपासूनच पावसाने झोपडलं आहे. त्यामुळे मुंबईची लोकल सेवा विस्कळीत झाली होती.तसेच अनेक सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे मुंबईकरांची मोठी गैरसोय झाली होती. ही परिस्थिती नियंत्रणात येत असताना आता मुंबईकरांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. (mumbai rain news in marathi imd issue red alert issue for mumbai heavy to heavy rainfall bmc warn mumbaikar)
ADVERTISEMENT
भारतीय हवामान खात्याने मुंबईकरांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील काही तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनो गरज नसेल तर घराबाहेर पडणे टाळा.कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. तसेच मदतीसाठी आणि अधिकृत माहितीसाठी BMC च्या मुख्य नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 1916 डायल करा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
हे ही वाचा : Worli Accident : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह आहे तरी कोण?
हे वाचलं का?
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे मुंबईतील तिन्ही मार्गावरील लोकल सेवा सुरळीत सुरु असली तरी लोकल विलंबानं धावतायत. लोकल सेवा सुरळीत असल्यानं कामावरुन घरी जाणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळालाय.
मुंबईसह रायगड आणि रत्नागिरीलाही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पालघर आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहेत. त्यामुळे या दोन जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
पावसामुळे मुंबईतील हे रस्ते बंद
मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. या पावसामुळे अनेक मार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. हे मार्ग कोणते आहेत. ते जाणून घ्या.
ADVERTISEMENT
पाणी साचल्याने सक्कर पंचायत चौक शिवडी वडाळा वाहतूकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे.
पाणी साचल्याने दादर टी.टी वाहतूकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.
इनकम टॅक्स ऑफिस येथे पावसाचे पाणी साचल्याने बीकेसी कनेक्टर कडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे.
कारच्या बिघाडामुळे वाशी ब्रिज उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे.
पाणी साचल्याने अंधेरी सबवे वाहतूकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान वाहतूकीचा मार्ग एस.व्हि रोडकडे वळविण्यात आला आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT