Mumbai Rain Update: अतिमुसळधार पावसाचा इशारा, मुंबई, ठाण्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई, ठाण्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबई, ठाण्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई पावसाचा रेड अलर्ट, महापालिकेकडून शाळांना सुट्टी जाहीर

point

सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश

point

आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे- आवाहन

Heavy rain warning (red alert) in Mumbai declared holiday for schools and colleges: मुंबई: भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला आहे.  या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना उद्या मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय ठाणे आणि नवी मुंबईमध्ये देखील शासनाच्या वतीने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (mumbai rain update heavy rain warning red alert holiday announced for all schools and colleges in mumbai thane)

मुंबई महापालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन

दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या पावसाचा इशारानंतर मुंबई महापालिकेने नागरिकांना आवाहन केलं आहे. अति मुसळधार पावसाचा इशारा (Red Alert) लक्षात घेता, नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा मदत सेवा क्रमांक 1916 यावर संपर्क साधावा. 

भारतीय हवामान खात्याने मुंबईत (दिनांक 8 जुलै 2024) अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबईकर नागरिकांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Mumbai Rain News LIVE Updates: मुंबईत पावसाची दादागिरी! 'हे' रस्ते बंद

मुंबईतील पावसाची परिस्थिती पाहता मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

जिल्ह्यात सद्यस्थितीतील अतिवृष्टी विचारात घेऊन व हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या अनुषंगाने इ. १ ली ते १२ वी च्या सर्व माध्यमाच्या/मंडळाच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते. याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील सर्व शाळांना दि. ०९/०७/२०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
उपरोक्त बाबत सर्व विद्यार्थी व पालक यांना आपल्या स्तरावरुन तात्काळ अवगत करावे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Raigad Fort: रायगडावर असं का घडलं?, ही दृश्य पाहून तुम्हीही हादरून जाल!

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी 

आदेश देण्यात येत आहेत की, दि.०९/०७/२०२४ रोजी अतीवृष्टी होणार असल्याबाबत इशारा प्राप्त झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर, मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या सर्व शाळा उद्या मंगळवार दि.०९/०७/२०२४, रोजी बंद ठेवण्यात याव्यात. सदर आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT